Friday, 2 May 2025
  • Download App
    सत्तेसाठी आत्तापासूनच गुंडा-पुंडांचे समर्थन, समाजवादी पक्षाच्या वतीने राजभर यांचा मुख्तार अन्सारीला पाठिंबा|Omprakash Rajbhar backs Mukhtar Ansari on behalf of Samajwadi Party

    सत्तेसाठी आत्तापासूनच गुंडा-पुंडांचे समर्थन, समाजवादी पक्षाच्या वतीने राजभर यांचा मुख्तार अन्सारीला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्तेसाठी उताविळ झालेल्या समाजवादी पक्ष आणि सोहलदेव भारत समाज पार्टीने आत्तापासूनच गुंडा-पुंडांना समर्थन द्यायला सुरूवात केली आहे. सोहेलदेव भारत समाज पार्टीचे ओमप्रकाश राजभर यांनी स्वत:सह समाजवादी पक्षाच्या वतीनेही खतरनाक गॅँगस्टर असलेला बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला पाठिंबा दिला आहे.Omprakash Rajbhar backs Mukhtar Ansari on behalf of Samajwadi Party

    उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांनी युती केली आहे. या पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी मऊ विधानसभा मतदारसंघात मुख्तार अन्सारी याला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी राजभर यांनी बांदा कारागृहात जाऊन अन्सारी यांची भेट घेतली.



    अन्सारीचे जाहीर समर्थन करताना राजभर म्हणाले निवडणुकीत सपा आणि सुभासपा युतीकडून पाठिंबा दिला जाईल. मुख्तार अन्सारी याने सुभासपाचे अधिकृत तिकिट घेतले नाही आणि अपक्ष म्हणून लढला तरीही त्याला पाठिंबा दिला जाईल.

    विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने यापूर्वी मुख्तार अन्सारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपल्या पक्षात घेण्यास नकार दिला होता. यावरून आपले काका शिवपालसिंह यादव यांच्याशी अखिलेश यांचा वादही झाला होता. त्यामुळे सपा पाठिंबा देईल का असे विचारले असता राजभर म्हणाले, सरकार बनवायचे असेल तर पाठिंबा देण्यास कोणतीही हरकत नाही.

    जर सत्तेसाठी अखिलेश मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाशी आघाडी करू शकतात तर मुख्तार अन्सारीला पाठिंबा देण्यास काय अडचण आहे?मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशातील माफिया असून त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारखे अनेक गन्हे दाखल आहे.

    त्याच्या विरोधात अवैध संपत्ती जमविल्याप्रकरणी ईडीने पीएमएलएह्णकायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव भूखंडावर बेकायदेशीर कब्जा केल्याच्या प्रकरणासह अन्य काही प्रकरणांचा समावेश आहे. सध्या मुख्तार अन्सारी हा बांदा कारागृहात आहे. त्याच्या टोळीवरही योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने कारवाई केली आहे.

    Omprakash Rajbhar backs Mukhtar Ansari on behalf of Samajwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही; सुप्रीम कोर्टाने म्हटले- अशा याचिकांमुळे सुरक्षा दलांचे मनोबल कमी होते

    Pahalgam attack: : INS सुरत हाजिरा बंदरावर तैनात; अरबी समुद्रात अँटी शिप-अँटी एयरक्राफ्ट फायरिंगचा सराव

    Baba Ramdev : शरबत प्रकरणी हायकोर्टाने बाबा रामदेव यांना अवमान नोटीस बजावली, न्यायालयात हजर राहावे लागेल