• Download App
    पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रोनचा शिरकाव; जुन्नरमध्ये ७ जणांना बाधा झाल्याने धाकधूक|Omicrons in rural Pune too , 7 infected with new virus in Junnar

    पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रोनचा शिरकाव; जुन्नरमध्ये ७ जणांना बाधा झाल्याने धाकधूक

    वृत्तसंस्था

    पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रॉनचा शिरकाव झाल्याचे वृत्त आहे. जुन्नरमध्ये ७ जणांना त्याची बाधा झाल्यामुळे ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.Omicrons in rural Pune too , 7 infected with new virus in Junnar

    जुन्नरमध्ये नारायणगाव – वारूळवाडी येथे ७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या ओमीक्रॉनने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे शहर, डोंबिवली, नागपूर आणि लातूरमध्ये रुग्ण आढळले होते.



    परंतु, ग्रामीण भागात एकही ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला नाही. पण आज जुन्नरमध्ये नारायणगाव – वारूळवाडी येथे ७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणे पालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

    जुन्नर तालुक्यात हे सात रुग्ण दुबईवरून आले होते. त्यांचा अहवाल एनआयव्ही संस्थेत पाठवला होता. आज ते पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपर्कातील ५० जणांचे अहवाल पाठवले आहेत. सातही रुग्णांची प्रकृती स्थिर असून नारायणगाव सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

    Omicrons in rural Pune too , 7 infected with new virus in Junnar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!