• Download App
    उत्तर प्रदेश ओमायक्रोन गाईड लाईन्स : रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत उत्तर प्रदेश लमध्ये कर्फ्यु, मास्क नसेल तर दुकानातून सामान मिळणार नाही | Omicron Guide Lines: Night curfew from 11 pm to 5 am in Uttar Pradesh, no masks no goods will be available in the shops

    उत्तर प्रदेश ओमायक्रोन गाईड लाईन्स : रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उत्तर प्रदेश लमध्ये कर्फ्यु, मास्क नसेल तर दुकानातून सामान मिळणार नाही

    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश : देशातील प्रत्येक राज्यामध्ये वाढणाऱ्या कोरोणाच्या केसेस लक्षात घेता आणि ओमायक्रॉन या विषाणूचा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहेत. या गाइडलाइन्स नुसार रात्री 11 ते सकाळी ५ वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कर्फ्यू असणार आहे. या काळामध्ये इमर्जन्सी सेवा जशा अॅम्ब्युलन्स, मेडिकल मात्र चालू असतील. पण मास्क हे कम्पलसरी करण्यात आले आहे.

    Uttar Pradesh Omicron Guide Lines: Night curfew from 11 pm to 5 am in Uttar Pradesh, no masks no goods will be available in the shops

    बाजारपेठांमध्ये मास्कशिवाय कोणी फिरत असेल, तर त्या व्यक्तीस दुकानदाराने सामान देऊ नये असे देखील आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे बाहेरून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.


    Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका-राज्यात नवी नियमावली जाहीर;काय आहेत नवे नियम?


    रेल्वे स्टेशन आणि विमानतळ येथे विशेष सुरक्षा आणि काळजी घेण्याची देखील सूचना देण्यात आलेली आहे. ज्या लोकांना विलीगिकरण करण्याची गरज आहे, ज्यांना उपचाराची गरज आहे. त्यांना तातडीने उपचार दिले जावेत, क्वारंटाइन केले जावे असे देखील सांगितले आहे.

    सार्वजनिक उत्सवांवर देखील आता निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणत्याही उत्साहामध्ये 200हून अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई केलेली आहे. सर्व आरोग्य व्यवस्था सोयी सुविधानी सज्ज ठेवण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांनी शुक्रवारी ह्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

    Uttar Pradesh Omicron Guide Lines: Night curfew from 11 pm to 5 am in Uttar Pradesh, no masks no goods will be available in the shops

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली