- ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार अलर्ट.
- ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढत चालल्यामुळे औषधांचा तुडवडा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणांनी हे पाऊल उचललेआहे. OMICRON ALERT : Stock up on essential medicines
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेला तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने केमिस्ट असोसिएशनला महत्वाच्या औषधांचा साठा करुन ठेवण्याचे आदेश देखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान रेमडिसीव्हीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये मेडीकलबाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या.
The National Pharmaceutical Pricing Authority आणि Drug Controller General of India च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन अँड ड्रगिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत देशभरातील सर्व केमिस्टने कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आवश्यक औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने या बैठकीत केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे कफ सिरप, पॅरासिटीमॉल टॅबलेट, सी व्हिटॅमिनच्या गोळ्या, झिंक टॅबलेट, अझिथ्रोमायसिन आणि आयवरमेक्टीन या औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता सर्व केमिस्ट दुकानांनी या औषधांचा साठा करुन ठेवावा असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर केमिस्ट असोसिएशननेही आपल्या सर्व सदस्यांना औषधाचा पुरेसा साठा करुन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ओमिक्रॉनची बाधा झालेले रुग्ण लवकर बरेही होत असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय यंत्रणांना प्रत्येक रुग्णाकडे जातीने लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढून तिसरी लाट येईल असा अंदाज वर्तवला आहे.
OMICRON ALERT : Stock up on essential medicines
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
- थिएटर कधी बंद करायचे हे तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेवर अवलंबून – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
- केंद्र सरकार लवकरच भारतीयांना ई-पासपोर्ट उप
- किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा सलग दुसऱ्या वेळा कोरोना संक्रमणामुळे पुन्हा स्थगित