आयएमएफने पाकिस्तानला दिलेल्या कर्जावर प्रश्न उपस्थित केले; तो म्हणाले…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Omar Abdullah जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादाबाबत जगाचे दुटप्पी निकष उघड केले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश परिस्थितीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून पाकिस्तानला मिळालेल्या कर्जावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की अशाप्रकारे तणाव कसा कमी करता येईल?Omar Abdullah
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आयएमएफने पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचा निधी दिला आहे. भारताने पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देण्यास तीव्र विरोध केला होता आणि म्हटले होते की पाकिस्तान या पैशाचा वापर दहशतवादाला निधी देण्यासाठी करू शकतो.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आयएमएफच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. “मला समजत नाही की ‘आंतरराष्ट्रीय समुदाय’ असाच कसा विश्वास ठेवतो की दक्षिण आशियातील तणाव कमी होईल, जेव्हा आयएमएफ पाकिस्तानला पूंछ, राजौरी, उरी, तंगधार आणि इतर अनेक ठिकाणी हल्ले करण्यासाठी वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांसाठी निधी देत आहे,” असे त्यांनी एक्स वर लिहिले.
Omar Abdullah exposes world’s double standards on terrorism
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!
- Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!