विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी आवाजी मतदानाने त्यांची अध्यक्षपदी निवड केली. विरोधी पक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची होती म्हणून त्यांनी के. सुरेश यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले होते. परंतु, प्रत्यक्षात लोकसभेत मतदानाच्या वेळी विरोधकांनी आकडेबळ आजमावणे टाळले. कारण त्यांना ममता बॅनर्जींच्या 29 खासदारांचा पाठिंबा नव्हता. शिवाय 7 खासदारांचा शपथविधी शिल्लक राहिल्याने त्यांनाही मतदान करता येणार नव्हते. त्यामुळे विरोधी आघाडीकडे 236 चे संख्याबळ असून देखील ते आणखी घटले. परंतु, ते सभागृहात दिसू नये म्हणून विरोधकांनी “काळजी” घेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष मतदान घेणे टाळले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्लांच्या नावाचा मांडलेला प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यास संमती देऊन टाकली. Om Birlach became the Speaker of the Lok Sabha for the second time in a row
18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला.
INDIA आघाडीचे उमेदवार के. सुरेश केरळच्या मवेलीकाराचे प्रतिनिधीत्व करतात. ते 8 वेळा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. या निवडणुकीत त्यांचा मार्ग सोपा नव्हता. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या 542 खासदार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही सीट खाली आहे. लोकसभेत 293 खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे 236 खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण 13 खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 271 मतांची आवश्यकता होती. परंतु प्रत्यक्षात स्वतःकडे आकडेबळ नसल्यामुळे विरोधकांनी निवडणूक टाळल्यामुळे विरोधी खासदारांचे संख्याबळ नेमके किती, हे गुलदस्त्यात राहिले.
Om Birlach became the Speaker of the Lok Sabha for the second time in a row
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + पवारांच्या संभाव्य खेळी ओळखून दिल्ली + महाराष्ट्रात काँग्रेसची सावध पण दमदार पावले!!
- राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत निर्णय
- केजरीवालांना मोठा झटका, उच्च न्यायालयाने जामीन देण्यास दिला नकार!
- भाजपला डॅमेज करून महायुतीतून खसकण्याचा अजितदादांचा डाव??; स्वबळावर लढण्याचे मिटकरींचे विधान!!