वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय संजय सिंग यांच्या निवडीमुळे ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू नाराज आहेत. Olympic medalist Sakshi Malik quits wrestling
कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली. यादरम्यान साक्षी मलिक भावूक झाली आणि तिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. यावेळी साक्षीने चपला उचलून टेबलावर ठेवल्या आणि तिथून उठून निघून गेली.
याआधी साक्षी म्हणाली की, आम्ही लढत जिंकू शकलो नाही, तर काही फरक पडत नाही. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून आलेल्या लोकांचे आभार. आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहणार आहे.
साक्षीने जड आवाजात सांगितले की, कुस्तीपटूंनी WFI मध्ये महिला अध्यक्षाची मागणी केली होती, पण ब्रिजभूषणची यंत्रणा किती मजबूत आहे, हे सर्वांनाच माहीती आहे. मी आणि बजरंग पुनिया गृहमंत्र्यांना भेटलो. आम्ही मुलींची नावे घेतली आणि कुस्ती वाचवा असे सांगितले, पण काही झाले नाही.
साक्षीने सांगितले की, नवे निर्वाचित अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे भागीदार आहेत. जोपर्यंत ब्रिजभूषण सिंग आणि त्यांच्यासारखे लोक कुस्ती संघटनेशी जोडलेले आहेत, तोपर्यंत आम्हाला न्यायाची आशा नाही. अशा परिस्थितीत मी आजपासूनच माझी कुस्ती सोडून देत आहे. आजपासून तुम्हाला मी मॅटवर दिसणार नाही.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले बजरंग पुनिया म्हणाले की, खेळाडू इतके दिवस गप्प का होते हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे. गेल्या वर्षी जानेवारीत आम्ही आंदोलन केले. त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली. आम्ही प्रथम सत्यासाठी लढत होतो. आता ते बहिणी-मुलींची लढाई लढत आहेत. आमच्याकडे होता तेवढा लढा आम्ही दिला पण सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.
बजरंग पुनिया म्हणाले की, ब्रिजभूषण यांचा राईट हॅन्ड असलेल्या व्यक्तीला WFI मध्ये अध्यक्ष बनवण्यात आले. ब्रिजभूषण त्यांना स्वतःच्या मुलापेक्षा जास्त मानतात, हे सर्वांनाच माहीत आहे. आपला लढा येणाऱ्या पिढ्यांनाही लढावा लागेल. केवळ आपणच नाही, तर आज संपूर्ण देशाने ब्रिजभूषणची यंत्रणा आणि शक्ती पाहिली आहे. हळूहळू ब्रिजभूषण सिंग यांचीही न्यायालयातून निर्दोष मुक्तता होईल.
Olympic medalist Sakshi Malik quits wrestling
महत्वाच्या बातम्या
- कोची रुग्णालयांमध्ये फ्लू सारख्या आजाराने ग्रस्त 30 टक्के लोक COVID-19 पॉझिटिव्ह
- देशात JN.1 व्हेरिएंटचे 21 नवीन रुग्ण; गोव्यात 19 केस; मे नंतर एका दिवसात सर्वाधिक 614 कोविड रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 मृत्यू
- “हा” फोटो पाहा, बॉडी लँग्वेज “वाचा” आणि INDI आघाडीचे “उज्ज्वल भवितव्य” ओळखा!!
- पाकिस्तानच्या शेअर बाजारात ३२ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण!