विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी आतापर्यंत तरी स्पर्धेला जाऊन येण्यापर्यंतच मर्यादित होती. गेल्या दोन ऑलिंपिक पासून भारत काहीशी चमकदार कामगिरी करून चार-पाच खेळाच्या इव्हेंट्स मध्ये ब्राँझ पदकांपर्यंत पोहोचत आहे. कुठल्याही खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये ब्राँझ पदक मिळवले, की भारताला आनंद होतो. देशातले पुढारी पदक विजेत्यांना भरघोस पारितोषिके जाहीर करतात. पदक विजेते त्यांच्या भेटीगाठी घेतात. पंतप्रधान मोदी तर थेट पदक विजेत्यांशी फोनवर बोलून त्यांचा त्यांचे अभिनंदन करतात. गेल्या दोन ऑलिंपिकचा हा अनुभव आहे.
2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये देखील आत्तापर्यंत भारताने 6 ब्राँझ पदके मिळवली. कुस्तीपटू दिनेश फोगटचा रौप्य पदकासाठीचा झगडा अजूनही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती पुढे सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पॅरिस ऑलिंपिक मध्ये ब्राँझ पदक जिंकणाऱ्या हॉकी टीमने पुढार्यांच्या भेटी पलीकडे जाऊन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद स्टेडियम वर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. भारतीय क्रीडा क्षेत्रात अनोखी घटना घडली.
पिस्टल शूटिंग मध्ये 2 ब्राँझ पदके मिळवण्याची विक्रमी कामगिरी करणाऱ्या मनू भाकरचे भारतात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिने वेगवेगळ्या पुढार्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, क्रीडामंत्री मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी वगैरे नेत्यांचा यात समावेश होता. बाकीचेही ऑलिंपिक पदक विजेते भारतात परतून पुढार्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पदक विजेत्यांबरोबरच प्रत्यक्ष ऑलिंपिक मध्ये सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंची प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
पण या पुढार्यांच्या भेटीगाठी पलीकडे जाऊन भारतीय हॉकी टीमने मात्र ब्राँझ पदक जिंकल्या बरोबर आपल्या क्रीडा पूर्वजाला म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहणे हे पुढारी आणि खेळाडू भेटीच्या परंपरेपलीकडे गेले. त्यामुळे ते विशेष महत्त्वाचे ठरले.
Olympic medal winners pay tribute to the hockey wizard beyond the meeting of leaders!!
महत्वाच्या बातम्या
- Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!
- India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले
- Eknath Shinde : बांगलादेश हिंसाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा!
- Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!