विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – ओडिशातील भुवनेश्वर-पुरी रस्त्यावर लौडंकी गावात प्राचीन खजिना सापडल्याचा दावा रिडिस्कव्हर लॉस्ट हेरिटेज या पथकाने केला. प्राचीन मूर्ती व मंदिराचे अवशेष सापडल्याचा पथकाचा दावा आहे. लौडंकीत गातेश्वर मंदिराच्या परिसरात या मूर्ती सापडल्या. हे मंदिर ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून अवघ्या ४० कि.मी.वर आहे.Old heritage idols found in odisha
पथकाचे प्रमुख अनिल धीर म्हणाले की, मंदिराच्या स्वयंपाकघराच्या मागील बाजूस कचऱ्याच्या एका मोठ्या ढिगाऱ्याखाली जवळपास दोन डझन प्राचीन मूर्ती सापडल्या. यापूर्वी, पथकाने प्राचीन मंदिराभोवती विखुरलेले कोरीव दगडी अवशेषही शोधले.
या मूर्तींमध्ये कार्तिकेयची मयूरासनातील तीन फूट उंचीची मूर्ती, गणपती व महिषासूरमर्दिनीच्या प्रत्येकी दोन फूट उंचीच्या मूर्तीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, सात फणा असलेली नागाची मूर्ती, मंदिराच्या अवशेषात अलास्यकन्या, ब्रुशाव, नारा विदाल आदींची कोरीव मूर्ती, शंकराचा पितळी मुखवटाही आढळला आहे.
यातील मुखवटा वगळता इतर वस्तू नवव्या ते बाराव्या शतकांदरम्यानच्या असण्याच्या अंदाज. सर्व मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या असून मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत कळविले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Old heritage idols found in odisha
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही