अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतशी राम आणि सनातन धर्माला शिव्या देण्याची विरोधकांची खुमखुमी वाढत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमधल्या विरोधी नेत्यांची ही खुमखुमी दररोजच्या त्यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे. पण सनातन धर्म आणि राम यांना शिव्या घालण्याची विरोधी पक्षांची परंपरा बिलकुलच नवीन नाही, ती जुनीच आहे. Old experiment of abusing sanatan dharma will fail again in 2024
किंबहुना 2024 मध्ये सुरू असलेला हा “शिव्या प्रयोग” 1990 च्या दशकात आधीच करून झाला आहे, पण त्यावेळी अवघ्या दीड दोन वर्षात ते प्रयोगकर्ते राजकारणातून जे अस्तंगत झाले, ते पुन्हा डोके वर काढू शकले नाहीत, हे देखील आज सनातन धर्माला शिव्या घालणाऱ्या त्यांच्याच राजकीय वंशजांच्या लक्षात येत नाही!!
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन, टू जी घोटाळ्यातले आरोपी ए. राजा, दयानिधी मारन, समाजवादी पार्टीचे नेते स्वामीप्रसाद मौर्य, शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे सगळे नेते राम आणि सनातन धर्माला शिव्या घालत आपले राजकारण आज पुढे रेटत आहेत, पण हाच प्रयोग 1990 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव यांनी करून झाला होता.
1990 च्या दशकातली प्रसार माध्यमांची भाषा होती, मंडल विरुद्ध कमंडल!! इंडिया टुडे, फ्रंटलाईन, द विक ही त्यावेळची आघाडीची माध्यमे “मंडल विरुद्ध कमंडल” याच भाषेचा प्रयोग करून भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला मारक ठरत होती.
यातले मंडलचे प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ प्रताप सिंह, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांनी हिंदुत्वाच्या राजकारणा विरोधात जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयोग करणारा “मंडल प्रयोग” करून पाहिला होता. तो वर्ष दीड वर्ष चालला, पण त्यानंतर मात्र हिंदुत्वाच्या राजकारणाला तो “मंडल प्रयोग” अवरोध करू शकला नाही
1991 दशकाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे देशव्यापी स्वरूप सगळ्या जनतेसमोर आले, तर समाजवादी मंडळींच्या जनता परिवाराचा “मंडल प्रयोग” राजकारणातून हळूहळू अस्तंगत होत गेला.
– जातींची व्होट बँक
1990 च्या दशकातली विश्वनाथ प्रताप सिंह मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव यांची हीच राजकारणाची स्टाईल होती की, भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी जाती-जातींमध्ये फूट पाडा. आपापल्या जातींचे संघटन करा आणि “यादव – मुस्लिम” “जाट – यादव – ठाकूर – मुस्लिम” असे जातींचे व्होट बँकेचे प्रयोग करत आपापले बालेकिल्ले तयार करून त्यावर राज्य करा. हे प्रयोग सुरुवातीला काही काळ चालले, पण नंतर तेच विश्वनाथ प्रताप सिंह, मुलायम सिंह आणि लालू यांच्याच अंगलट आले. त्यांच्या समाजवादी जनता परिवारातच फूट पडून त्यांचे वेगवेगळे पक्ष तयार झाले आणि त्यांचे राजकारण 2000 च्या दशकात आटोपले. नंतर तर ते पूर्ण अस्तंगत झाले.
त्याउलट सर्वसमावेशक हिंदुत्वाचे राजकारण मात्र 1990 च्या दशकापासून जे फोफावले, ते 2004 ते 2014 एवढ्या 10 वर्षांमध्ये थोडे बॅकफुटवर गेलेले दिसले, पण त्यानंतर पुन्हा उसळून वर आले, ते 2024 पर्यंत. 2024 मध्ये देखील भारताचे राजकारण हिंदुत्व भोवतीच फिरणारे राहिले आहे आणि त्या हिंदुत्वाला अवरोध निर्माण करण्यासाठी “इंडिया” आघाडीतले सोनिया गांधी, शरद पवार, नितीश कुमार, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष 1990 चा प्रयोग करत आहेत. फक्त त्या प्रयोगाला आज ते “मंडल प्रयोग” अथवा “मंडल आयोग” असे नाव देत नाहीत, तर “जातनिहाय जनगणना” या नावाखाली जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचे राजकारण ते करत आहेत आणि त्याचवेळी वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांचे दुसऱ्या फळीतले नेते उदयनिधी स्टालिन, ए. राजा, स्वामीप्रसाद मौर्य आणि जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्म आणि रामाला शिव्या देण्यात धन्यता मानत आहेत.
1990 चा “मंडल प्रयोग” फार थोडा काळ चालून नंतर फसला, पण त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व तेवढे बळकट नव्हते आणि पक्ष सत्तेवर देखील नव्हता.
– हिंदुत्वाला व्यापक आधार
2024 मध्ये मात्र याच्याबरोबर उलटी स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व कधी नव्हे, एवढे बळकट आहे आणि पक्ष पूर्ण बहुमतानिशी सत्तेवर आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने व्यापक हिंदुत्वाच्या राजकारणाला सेवा आणि सवलती यांचा भरभक्कम आधार दिला आहे. त्यातून “इंडिया” आघाडीचे जातनिहाय राजकारण उभे राहण्याआधीच मोदींनी या देशात चारच जाती आहेत. गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या जातींचे मी कल्याण करू इच्छितो, असे सांगून काटशह दिला आहे. त्यामुळे “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांना केवळ धक्काच बसत नाही, तर त्यांचे जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचे राजकारण पूर्णपणे उन्मळून पाडण्याची ताकद मोदींच्या या घोषणेत आहे, हे दिसून येते.
पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या राजकीय पूर्वजांनी केलेल्या जुन्या चुकांमधून “इंडिया” आघाडीतले नेते शिकत नाहीत, ही बाब ठळकपणे अधोरेखित होते!!
Old experiment of abusing sanatan dharma will fail again in 2024
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे