• Download App
    भारतीय महिला क्रिकेट संघातील 'या' खेळाडूकडून, पंतप्रधान मोदींसह कॅबिनेटबद्दल इन्स्टावर आक्षेपार्ह पोस्ट!|Offensive post from Indian women's cricket team player Pooja Vastrakar about cabinet with PM Modi

    भारतीय महिला क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूकडून, पंतप्रधान मोदींसह कॅबिनेटबद्दल इन्स्टावर आक्षेपार्ह पोस्ट!

    सर्वस्तरातून टीका, टिप्पणी सुरू झाल्यानंतर आणि ट्रोलिगं सुरू झाल्यानंतर माफीही मागितील, जाणून घ्या काय आहे प्रकरण


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर पूजा वस्त्राकर इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकल्याने वादात सापडली आहे. शुक्रवारी पूजाने ‘वसुली टायटन्स’ नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांची खिल्ली उडवणारी पोस्ट केली. या पोस्टनंतर विविध प्रकारच्या कमेंट्स येऊ लागल्या, त्यानंतर पूजाने ती पोस्ट डिलीट केली. पूजा वस्त्राकरने नंतर माफीही मागितली.Offensive post from Indian women’s cricket team player Pooja Vastrakar about cabinet with PM Modi



    अष्टपैलू पूजा वस्त्राकर ही भारतीय महिला संघाची महत्त्वाची सदस्य आहे. तिने शुक्रवारी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचे वसुली टायटन्स असे वर्णन करण्यात आले आहे.

    या फोटोमध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, एस जय शंकर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि दुसऱ्या बाजूला अनुराग ठाकूर, हरदीपसिंग पुरी, नितीन गडकरी दिसतील. पूजाच्या वतीने ही गोष्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली. आणि त्यावर आणखी एक कॅप्शन टाकण्यात आले होते ज्यामध्ये ED ला इम्पॅक्ट प्लेयर असे वर्णन केले होते. ही पोस्ट सध्या हटवण्यात आली आहे.

    काही युजर्सनी पूजा वस्त्राकरची ही पोस्ट काँग्रेसला पाठिंबा म्हणून पाहिली तर काहींनी भाजपच्या विरोधाशी जोडले. दरम्यान, पूजाने ही पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट करून माफीही मागितली. पूजा वस्त्राकरने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या लक्षात आले की माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक अतिशय आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. माझ्याजवळ फोन नसताना हा प्रकार घडला. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी आदरणीय पंतप्रधानांचा खूप आदर करतो आणि आधीच्या पोस्टबद्दल माफी मागते. आणि या पोस्टमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी माफी मागते. ही पोस्ट तिच्या मोबाईलवरून केल्याचे पूजाने स्पष्टपणे मान्य केले आहे.’

    Offensive post from Indian women’s cricket team player Pooja Vastrakar about cabinet with PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य