• Download App
    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; वंदे भारताचे उद्घाटन रद्द|Odisha train accident death toll rises to 233, 900 injured; Relief and rescue operations on war footing!!; Inauguration of Vande Bharat canceled

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; वंदे भारताचे उद्घाटन रद्द

    वृत्तसंस्था

    बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप घातली आणि एक दोन नाही तर तब्बल 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 233 झाली असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे.Odisha train accident death toll rises to 233, 900 injured; Relief and rescue operations on war footing!!; Inauguration of Vande Bharat canceled



    ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. अपघातस्थळावरुन मिळालेल्या अहवालात हा आकडा 233 वर पोहोचली आहे. जखमींची संख्या 900 च्या आसपास आहे. ओडिशाच्या बालासोर इथे काल संध्याकाळी एक प्रवासी ट्रेन दुसर्‍या ट्रेनच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर आदळल्याने हा भयंकर अपघात झाला.

    ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला.

    त्यातील तीन ते चार डबे रुळावरुन घसरले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, ‘अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.’ एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.

    Odisha train accident death toll rises to 233, 900 injured; Relief and rescue operations on war footing!!; Inauguration of Vande Bharat canceled

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!