वृत्तसंस्था
भुवनेश्वर : प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज गणेश चतुर्थी निमित्त जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर श्रीगणेशाचे वाळू शिल्प साकारले आहे. या वाळू शिल्पावर त्यांनी शंख, शिंपल्यांची आणि समुद्रात मिळणाऱ्या विशिष्ट अवशेषांची अप्रतिम रचना केली आहे. Odisha: Sand artist Sudarsan Pattnaik created an installation sculpture of Lord Ganesh, using seashells with the message “World Peace” at a beach in Puri yesterday
श्री गणेशाचे शिल्प विश्वशांतीसाठी समर्पित करत असल्याची भावना सुदर्शन पटनायक यांनी व्यक्त केली आहे. सुदर्शन पटनायक हे नेहमी विविध सण, राष्ट्रीय सण, राष्ट्रीय महोत्सव यानिमित्ताने वर्षानुवर्षे अशी वाळूशिल्पे साकारताहेत. जगभरात त्यांचे फॅन फॉलोइंग मोठे आहे.
आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी श्री गणेशाचे शिल्प साकारून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली आहे. तसेच संपूर्ण जगाला कोरोनाच्या भयापासून मुक्त कर, अशी विनवणी त्यांनी श्री गणेशाकडे केली आहे.
Odisha: Sand artist Sudarsan Pattnaik created an installation sculpture of Lord Ganesh, using seashells with the message “World Peace” at a beach in Puri yesterday
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव
- देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार
- गॅस सिलिंडर नको त्याऐवजी चूल द्या!, उत्तर प्रदेशातील आमदाराची अजब मागणी
- लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवातला महत्तम संस्कृतीत पैलू!!