वृत्तसंस्था
भुवनेश्वर : कर्नाटक निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला असला तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असे भाकीत ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी करून तथाकथित विरोधी ऐक्याला पुन्हा एकदा धक्का दिला आहे.Odisha CM Naveen Patnaik expecting PM Narendra Modi’s return in 2024
11 मे 2023 रोजी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी घेत असतात तिकडे नवीन पटनाईक यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांच्या समवेत जगन्नाथ पुरी आंतरराष्ट्रीय विमानतळा विषयी चर्चा केली.
त्यानंतर त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली होती. नितीश कुमार यांच्या मुंबई दौऱ्याआधी यांनी आणि ममता बॅनर्जी यांनी नवीन पटनाईक यांची भेट घेतली होती. तरी देखील पटनाईक यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या आघाडीची शक्यता तेव्हा फेटाळून लावली होती.
त्यानंतर त्यांनी काल पुन्हा एकदा विरोधी ऐक्याची शक्यता फेटाळताना त्यांचा बिजू जनता दल हा पक्ष ओरिसात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी जगन्नाथ पुरी आंतरराष्ट्रीय विमानतळ विषयी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार वर्षात या विमानतळाचे काम पूर्ण करतील
आणि ते स्वतःच त्याच्या उद्घाटनावर जगन्नाथ पुरीला येतील, असे वक्तव्य नवीन पटनाईक यांनी केले. यातून त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयाची खात्री दिली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या भाजपच्या पराभवानंतर नवीन पटनाईक यांचे हे वक्तव्य आल्याने त्याला राजकीय दृष्ट्या वेगळे महत्त्व आहे
Odisha CM Naveen Patnaik expecting PM Narendra Modi’s return in 2024
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी 28 मे रोजी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन, 28 महिन्यांत झाले पूर्ण, का निवडली ही तारीख? वाचा सविस्तर
- India is Great! हिंद महासागरात बुडाले चिनी जहाज, बचाव व शोधकार्यासाठी भारतीय नौदलही सरसावले
- वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याविषयी काय लिहिलय वाचा!!; फडणवीसांचा टोला
- Karnataka Election : “दलित उपमुख्यमंत्री न केल्यास…” कर्नाटक काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा हायकमांडला इशारा!