• Download App
    ओडिशा, आंध्र प्रदेशला उद्या चक्रीवादळ धडकण्याची शक्यता ; प्रशासन लागले कामाला| Odisha, Andhra Pradesh likely to be hit by cyclone tomorrow; The administration started working

    ओडिशा, आंध्र प्रदेशला उद्या चक्रीवादळ धडकण्याची शक्यता ; प्रशासन लागले कामाला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून, जवाद नावाचे हे चक्रीवादळ उद्या शनिवारी ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यावेळी ताशी १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा तसेच मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.Odisha, Andhra Pradesh likely to be hit by cyclone tomorrow; The administration started working

    आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगर तर ओडिशातील किनारी जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो. या भागाबरोबरच पश्चिम बंगालमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना चक्रीवादळाबद्दल व त्याचा तडाखा बसणाऱ्या प्रदेशाबद्दल माहिती दिली.दक्षिण थायलंडच्या परिसरात ३० नोव्हेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

    येत्या १२ तासांत हा पट्टा अंदमानच्या समुद्रात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पश्चिम-वायव्य दिशेला सरकून आग्नेय बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊ शकते. त्यानंतरच्या २४ तासांत त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

    Odisha, Andhra Pradesh likely to be hit by cyclone tomorrow; The administration started working

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे