• Download App
    झारखंडच्या आरोग्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, म्हणाले- प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र; भाजपने केली राजीनाम्याची मागणी|Obscene Video of Jharkhand Health Minister Viral, Said- Conspiracy to Tarnish Image; BJP demanded resignation

    झारखंडच्या आरोग्यमंत्र्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, म्हणाले- प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र; भाजपने केली राजीनाम्याची मागणी

    वृत्तसंस्था

    रांची : इंटरनेट जगतात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र यातील एका व्हायरल व्हिडिओमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री एका मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत. या व्हिडीओमध्ये मुलगी नग्न अवस्थेत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांनी मंत्री बन्ना गुप्ता यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याच वेळी, याप्रकरणी मंत्री बन्ना गुप्ता यांच्या वतीने हा बनावट आणि एडिटेड व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.Obscene Video of Jharkhand Health Minister Viral, Said- Conspiracy to Tarnish Image; BJP demanded resignation

    मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले की, ‘राजकीय विरोधकांनी माझी प्रतिमा डागाळण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामध्ये व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मी एफआयआर दाखल केला असून पोलीस याप्रकरणी कारवाई करतील.



    रविवारी संध्याकाळी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मंत्री बन्ना गुप्ता यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. हे शेअर करत निशिकांत यांनी लिहिले की, काँग्रेस नेत्यांना महिलांचा आदर कसा करावा हेच कळत नाही. निशिकांत दुबे यांनी लिहिले आहे की, ‘हे काँग्रेसचे चारित्र्य आहे, हा आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांचा कथित व्हिडिओ आहे. काँग्रेससाठी ही शरमेची बाब आहे.

    दुसरीकडे, भाजप खासदाराच्या या ट्विटनंतर मंत्री बन्ना गुप्ता यांच्या कार्यालयातून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे की, ‘सोशल मीडियावर माझी प्रतिमा खराब करण्याचा हा काही प्रमुख राजकीय विरोधकांचा सुनियोजित कट आहे’. हा बनावट व्हिडिओ जाणूनबुजून व्हायरल करण्यात आला आहे. हे काम एडिटिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या विरोधात मी एफआयआर दाखल केली आहे, लवकरच पोलीस तपास करून या प्रकरणातील संपूर्ण सत्य सर्वांसमोर मांडतील.

    मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

    आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगत आहेत, मंत्र्याच्या अश्लील चॅटिंग व्हिडीओबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, तर दुसरीकडे रांचीचे खासदार संजय यांनी एक निवेदन जारी करून नैतिक कारणामुळे बन्ना गुप्ता यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यांनी झारखंडचे राज्यपाल राधाकृष्णन यांना विनंती केली आहे की, अशा अनैतिक आणि व्यभिचारी मंत्र्याला मंत्रिमंडळातून त्वरित बडतर्फ करावे. त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी.

    आता हा व्हिडीओ एडिट केला आहे की नाही हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल, सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    Obscene Video of Jharkhand Health Minister Viral, Said- Conspiracy to Tarnish Image; BJP demanded resignation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य