विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हर्च्युअल शिक्षण पद्धती’ने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अतिखाणे, ताणतणाव तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. ३० टक्के लोकसंख्येमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे ‘आयसीएमआर-इंडियाबी’ ने आपल्या अभ्यासात म्हटले आहे. देशभरातील महत्त्वाच्या शहरांतील लोकांचा आरोग्यविषयक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्यविषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पुढील २० वर्षांत २०४० पर्यंत विकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. Obesity increased due to work from home
लठ्ठपणाच्या समस्यांचा जीवनशैलीविषयक विकारांशी घनिष्ठ संबंध आहे. लठ्ठपणामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. आरोग्य उत्तम राखण्याकरिता वजन व्यवस्थापन मुख्य निकष असल्याचे अनेक जणांना वाटते; मात्र ते पुरेसे नसून त्यासाठी ‘बॉडी मास इंडेक्स’सारख्या पद्धतींचा वापर महत्त्वाचा आहे. यामुळे शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी अनेक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे शक्य होते. शरीराचा बीएमआय ३० किंवा त्याच्या वर असल्यास लठ्ठपणा आणि २५-३० बीएमआय असल्यास अतिवजन असण्यावर शिक्कामोर्तब होते. यामुळे हृदय रोग, उच्च रक्तदाब, श्वसनाच्या समस्या व अन्य विकार उद्भणवू शकतात.
Obesity increased due to work from home
महत्त्वाच्या बातम्या
- नवी मुंबईमध्ये दारडीचे संकट कायम, दगड खाण कामामुळे डोंगर खिळखिळे ; पायथ्याखालील ६० हजार घरांना धोका
- Success Story : MBA चायवाला गुजरातच्या तरुणाची चहाची टपरी ; अवघ्या चार वर्षात करोड़पति-चमत्कार चायवाल्याचा
- केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक
- उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या