• Download App
    ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक, पंकजा मुंडे यांचा इशारा|OBC is naive, but he also has a third eye, save OBC reservation otherwise eruption, Pankaja Munde warns

    ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक, पंकजा मुंडे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    लातूर : ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे. ओबीसींचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.OBC is naive, but he also has a third eye, save OBC reservation otherwise eruption, Pankaja Munde warns

    लातूरमध्ये ओबीसी मेळाव्यात बोलताना मुंडे महाविकास आघाडीला इशारा देताना म्हणाल्या, ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे.



    तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलवू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल. ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे.

    मुंडे म्हणाल्या,मराठा आणि ओबीसी समाजात वाद पेटवण्याचं पाप जर कुणी करत असेल तर आम्ही त्यालासुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. ही आज माझी खंबीर भूमिका आहे. आमच्यामध्ये तुकडे पाडायची काही गरज नाही. एक वज्रमूठ आम्ही बनवू. ही बहुजनांची लढाई सामान्य माणसांसाठी आहे.

    चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलिही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलिही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    OBC is naive, but he also has a third eye, save OBC reservation otherwise eruption, Pankaja Munde warns

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य