Friday, 9 May 2025
  • Download App
    नुपूर शर्माला शिरच्छेदाची धमकी देणाऱ्या अजमेर शरीफ दर्गाचा खादीम सलमान चिश्तीला रातोरात अटक!!|Nupur Sharma threatened with beheading Ajmer Sharif Dargah Khadim Salman Chishti arrested overnight !!

    नुपूर शर्माला शिरच्छेदाची धमकी देणाऱ्या अजमेर शरीफ दर्गाचा खादीम सलमान चिश्तीला रातोरात अटक!!

    वृत्तसंस्था

    अजमेर : प्रेषित मोहम्मदा संदर्भात कथित वादग्रस्त उद्गार काढण्याच्या मुद्द्यावरून देशात जिहादी हिंसाचार माजला असताना आणखी एक मामला समोर आला आहे. हे उद्गार काढणाऱ्या नुपूर शर्मालाच शिरच्छेदाची धमकी आली आहे.Nupur Sharma threatened with beheading Ajmer Sharif Dargah Khadim Salman Chishti arrested overnight !!

    अजमेर शरीफ दर्गाच्या खादीमने नुपूर शर्माला शिरच्छेदाची धमकी दिली आहे. अजमेर शरीफ दर्गाचा खादीम सलमान चिश्ती याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी करून नुपूर शर्माचा शिरच्छेद करून तिचे मुंडके आणून दाखवेल त्याला आपले घरदार, सारी संपत्ती बक्षीस देऊन सलमान चिश्ती दुसरीकडे निघून जाईल, असे त्याने म्हटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा सलमान चिश्ती हिस्ट्री शिटर आहे. नुपूर शर्मा विरोधात हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ताबडतोब राजस्थान पोलिसांनी त्याची दखल घेऊन काल रातोरात सलमान चिश्ती याला अटक केली आहे. अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी ही माहिती दिली आहे.



    नुपूर शर्मा प्रकरणात आधीच उदयपूर, अमरावती आणि अयोध्येत गळे चिरून हत्या झाल्या आहेत. त्यानंतर आता थेट नुपूर शर्मालाच शिरच्छेदाची खुलेआम धमकी दिल्याचा मामला समोर आला आहे.

    अमरावती जिहाद : जिहादी मानसिकतेतूनच उमेश कोल्हेंची हत्या!!

    अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड केल्याने त्यांची हत्या झाल्याचे डीसीपी उमेश साळवे यांनी सांगितले. याचा अर्थ जिहादी मानसिकतेच्या गुन्हेगारांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणी अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांनीही नुपूर शर्मा प्रकरणातूनच हत्या झाल्याच्या घटनेला पत्रकार परिषदेत दुजोरा दिला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यानेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेंचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जात आहे.

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे.

    कधी झाली होती हत्या?

    उमेश कोल्हे हे मंगळवार दि.21 जून रोजी रात्री तहसील कार्यालय परिसरातील आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून मुलगा संकेत (27) व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीत तिघांनी लूटमारीच्या उद्देशाने उमेश यांना अडवून चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हेच्या हत्येची योजना आठवडाभरापासून आखली जात होती. 54 वर्षीय कोल्हे यांनी नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या.

    या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींपैकी एक आरोपीने आपल्या कबुली जबाब नुपूर शर्मा तिच्या समर्थनाच्या पोस्टचा उल्लेख केला आणि त्यातून या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वेगळे वळण लागले आहे. इतकेच नाही तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड इमरान खान हा इंदूर मधल्या एका बलात्कार प्रकरणात आरोपी आहे. त्याने एका विवाहित हिंदू मुलीला पळवून तिला गुंगीचे औषध देऊन तिला अमरावती पळवून आणून तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

    Nupur Sharma threatened with beheading Ajmer Sharif Dargah Khadim Salman Chishti arrested overnight !!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    महत्त्वाची बातमी: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला, युद्धासारख्या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या!!

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा