• Download App
    गोरखपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर; स्वतः योगींनी ट्विट करून दिली माहिती । Number of corona victims in Gorakhpur is zero; Yogi himself tweeted the information

    गोरखपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर; स्वतः योगींनी ट्विट करून दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर मध्ये आज कोरोनाग्रस्तांची संख्या शून्यावर पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. गोरखपूर जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य मंत्रालयाने समन्वयाने ही कामगिरी साध्य केल्याचे योगी यांनी स्पष्ट केले आहे. Number of corona victims in Gorakhpur is zero; Yogi himself tweeted the information

    महान गुरु गोरक्षनाथ यांची पावनभूमी गोरखपूर आज कोरोना ग्रस्तांच्याची संख्येत शून्यावर पोहोचले आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाचे हे महत्त्वाचे यश आहे. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.

    प्रियांकांची रॅली

    गोरखपुर गेल्या आठवड्यामध्ये विशेष चर्चेमध्ये होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी गोरखपूरची भूमी निवडली होती. तेथे प्रियांका गांधी यांनी मोठ्या रॅलीला संबोधित केले होते. 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या या रॅलीत सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबरच्या उंचीची भलीमोठी पोर्ट्रेट्स प्रियांका गांधी यांचीही लावण्यात आली होती. “मै भी प्रियांका” असे फलक घेतलेल्या अनेक युवती प्रियांका गांधींच्या रॅलीत उपस्थित होत्या.

    योगी आदित्यनाथ हिंदी गोरखपूर मधून पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. आणि आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गोरखपूरच्या भूमीतूनच योगी आदित्यनाथ यांना आव्हान देण्याचे “राजकीय चातुर्य” प्रियांका गांधी यांनी दाखविले होते. आज तेच गोरखपूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या मेहनतीमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत शून्यावर येऊन पोहोचले आहे.

    Number of corona victims in Gorakhpur is zero; Yogi himself tweeted the information

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार