• Download App
    जेईई मेन्सच्या पेपरफुटीप्रकरणी एनएसयुआय करणार देशभर निदर्शने|NSUI protest against paper leak issue

    जेईई मेन्सच्या पेपरफुटीप्रकरणी एनएसयुआय करणार देशभर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – जेईई मेन्सच्या पेपरफुटीबद्दल कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच एनएसयुआयने उद्या देशभरात निदर्शनांचीही घोषणा केली आहे.NSUI protest against paper leak issue

    या प्रकरणी कॉंग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ, दिल्ली कॉंग्रेसच्या नेत्या अलका लांबा, एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे, असे गौरव वल्लभ म्हणाले.



    तसेच या निमित्ताने मध्यप्रदेशातील व्यापम, २०१७ मधील एसएससी आणि २०१८ मधील सीबीएसईच्या ११ वी आणि १२ वीच्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांची, हरियानातील प्रवेश परिक्षेच्या पेपरफुटीचेही दाखले देताना सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले.

    “पेपर फोडणाऱ्या सरकारने” देशातील प्रत्येक तरुणाला उत्तर द्यावे, असे आव्हानही गौरव वल्लभ यांनी दिले. एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज कुंदन यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नोकरभरतीसाठीचे पेपर फोडले जात असल्याचा आरोप केला. तसेच अशा बऱ्याच पेपरफुटीची माहिती जाहीर झाली नसल्याचाही दावा केला.

    NSUI protest against paper leak issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी