• Download App
    आता तरुण मुरारीबापूने उधळली महात्मा गांधींविषयी मुक्ताफळे । Now young Muraribapu has squandered pearls about Mahatma Gandhi

    आता तरुण मुरारीबापूने उधळली महात्मा गांधींविषयी मुक्ताफळे

    वृत्तसंस्था

    भोपाळ : कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबद्दल अवमानास्पद विधान केल्याच्या घटनेला काही दिवसच उलटत नाही, तोच पुन्हा एकदा तसा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशद्रोही होते, असे विधान करत भागवत कथाकार तरुण मुरारीबापू याने वाद निर्माण केला आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान तरुण मुरारीबापूने केलेल्या या विधानाबद्दल त्याच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल झाला आहे. Now young Muraribapu has squandered pearls about Mahatma Gandhi



    एका कार्यक्रमादरम्यान तरुण मुरारीबापू म्हणाला की,‘‘गांधीही महात्माही नाहीत आणि राष्ट्रपिताही नाहीत. त्यांनी देशाचे तुकडे केल्याने त्यांना देशद्रोही म्हणायला हवे.’’ त्याच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तरुण मुरारीबापूविरोधात गुन्हा नोंदविला.
    या विधानाबाबत मुरारीबापूला आज विचारले असता, त्याने विधानावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित धर्मसंसदेत कालिचरण महाराजाने गांधीजींविरोधात आक्षेपार्ह विधान करत नथुराम गोडसेचे कौतुक केले होते.

    Now young Muraribapu has squandered pearls about Mahatma Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य