प्रतिनिधी
नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (BOB) ने सोमवारी (5 जून) इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) नावाची नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या नवीन सेवेद्वारे बँकेचे ग्राहक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून BOB ATM मधून पैसे काढू शकतात.Now withdraw money from ATMs with UPI, allow 2 transactions in one day in BOB
एका दिवसात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढता येतील बँक ऑफ बडोदा ही UPI द्वारे रोख पैसे काढण्याची सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. या सेवेचा वापर करून ग्राहक त्याच्या खात्यातून दिवसातून फक्त 2 वेळा व्यवहार करू शकतो. बँकेने या सेवेअंतर्गत 5,000 रुपयांची व्यवहार मर्यादा ठेवली आहे. म्हणजेच, ग्राहक या सेवेतून एका दिवसात 2 व्यवहार करून जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतात.
ही सुविधा फक्त बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांपुरती मर्यादित नाही. BHIM UPI, BOB World UPI आणि त्यांच्या मोबाइल फोनवर ICCW सुविधेसाठी सक्षम केलेले इतर UPI अॅप वापरणारे इतर बँकांचे ग्राहक त्यांचे डेबिट कार्ड न वापरता बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.
बँक ऑफ बडोदाचे भारतात 11,000 पेक्षा जास्त एटीएम
बँक ऑफ बडोदाचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा म्हणाले की, बँकेने सादर केलेली नवीन ICCW सुविधा ग्राहकांना प्रत्यक्ष कार्डचा वापर न करता पैसे काढण्याचे स्वातंत्र्य देते. रोख काढण्याचा हा एक सोपा, सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे. बँक ऑफ बडोदाचे संपूर्ण भारतात 11,000 पेक्षा जास्त एटीएम आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाइस टॅम्परिंग यांसारख्या कार्ड फसवणूक टाळण्यासाठी बँकांना ATM द्वारे ICCW पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
Now withdraw money from ATMs with UPI, allow 2 transactions in one day in BOB
महत्वाच्या बातम्या
- अरबी समुद्रात चक्रीवादळ बिपरजॉयची निर्मिती, उत्तरेकडे कूच, केरळमध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनच्या ढगांना रोखले
- मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करणार, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान, 2016 मध्ये पहिल्यांदा संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले
- भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!
- Delhi AIIMS : हॅकर्सनी पुन्हा एकदा दिल्ली ‘एम्स’ला केले लक्ष्य! रुग्णालयानेच सायबर हल्ल्याची दिली माहिती