• Download App
    मालेगाव स्फोट प्रकरण : योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांची नावे घेण्यासाठी एटीएसने दबाव आणला; साक्षीदाराची कोर्टात माहिती Now with upcoming elections in 5 states, bringing a witness after 13-14 years to claim that they were forced to falsely name Yogi Adityanath

    मालेगाव स्फोट प्रकरण : योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांची नावे घेण्यासाठी एटीएसने दबाव आणला; साक्षीदाराची कोर्टात माहिती

    वृत्तसंस्था

    मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार लोकांची नावे गुंतवण्यासाठी त्यावेळच्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर दबाव आणला होता, अशी साक्ष एका साक्षीदाराने आज भर कोर्टात दिल्याने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. Now with upcoming elections in 5 states, bringing a witness after 13-14 years to claim that they were forced to falsely name Yogi Adityanath

    हे तेच बॉम्बस्फोट प्रकरण आहे, की ज्यामध्ये विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. आज संबंधित साक्षीदाराने कोर्टाला हे स्पष्टपणे सांगितले, की एटीएसचे अधिकाऱ्यांनी माझा वैयक्तिक छळ करून तसेच माझ्या कुटुंबीयांचा छळ करण्याची आणि फसवणूक करण्याची धमकी देऊन माझ्याकडून योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार, देवधर आदी चार कार्यकर्त्यांची नावे मला मालेगाव स्फोट प्रकरणात घ्यायला लावली होती. त्यांच्या दबावापोटी मी ही नावे घेतली होती अशी साक्ष आज संबंधित साक्षीदाराने दिली आहे.

    कोर्टात आपली साक्ष फिरवणारा हा पंधरावा साक्षीदार आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 220 जणांच्या साक्षी झाल्या आहेत. परंतु थेट एटीएसवर आरोप करून योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांना गुंतवण्याचा प्रकार साक्षीदाराने पुढे आणल्याने मालेगाव स्फोट प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

    Now with upcoming elections in 5 states, bringing a witness after 13-14 years to claim that they were forced to falsely name Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट