• Download App
    आता हिंदू विषयावर मिळणर मास्टर्स डिग्री, बनारस हिंदू विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू|Now will get a master's degree in Hindu subject, course at Benaras Hindu University

    आता हिंदू विषयावर मिळणर मास्टर्स डिग्री, बनारस हिंदू विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू

    विशेष प्रतिनिधी

    बनारस : पंडित गंगानाथ झा व पंडित मदनमोहन मालवीय यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने हिंदू धर्म या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे.Now will get a master’s degree in Hindu subject, course at Benaras Hindu University

    या अभ्यासक्रमामुळे हिंदू धर्माच्या अनेक अज्ञात पैलूंबाबत माहिती मिळेल आणि या धमार्ची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असे विद्यापीठाचे मुख्याधिकारी प्रा. व्ही.के. शुक्ला यांनी सांगितले. भारत अध्ययन केंद्राच्या कला शाखेतील तत्त्वज्ञान व धर्म, संस्कृत आणि प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या विभागांच्या समन्वयाने हा अभ्यासक्रम चालवला जाणार आहे.



    एका परदेशी विद्यार्थ्यासह ४५ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रवेश घेतला आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाची ४ सत्रे आणि १६ पेपर असतील, अशी माहिती भारत अध्ययन केंद्राचे समन्वयक सदाशिव कुमार द्विवेदी यांनी दिली.

    अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याची कल्पना सर्वप्रथम पंडित गंगानाथ झा व पंडित मदनमोहन मालवीय यांनी दिली होती. मात्र काही कारणांमुळे त्या वेळी हा अभ्यासक्रम सुरू होईल शकला नाही, असे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वाराणसी केंद्राचे संचालक विजय शंकर शुक्ला यांनी सांगितले.

    Now will get a master’s degree in Hindu subject, course at Benaras Hindu University

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Tatanagar : आंध्र प्रदेशमध्ये टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग, 1 जणाचा मृत्यू; 2 एसी डबे जळाले

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय