संपूर्ण देशात द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने मोठे यश मिळविले. लोकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आता विकिपीडिया ही संस्था या चित्रपटाच्या विरोधात उतरली आहे. हा चित्रपट एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. Now Wikipedia has also come down against the Kashmir Files movie, accusing it of being a conspiracy
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने मोठे यश मिळविले. लोकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आता विकिपीडिया ही संस्था या चित्रपटाच्या विरोधात उतरली आहे. हा चित्रपट एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
विकिपीडियाने या चित्रपटातील घटनांना काल्पनिक म्हटले आहे. हा चित्रपट काश्मीरमधील वादग्रस्त प्रदेशात काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनाची एक काल्पनिक कथा अहे.1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या निर्गमनाला नरसंहार म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
अग्निहोत्री यांनी याला उत्तर देताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय विकिपीडिया, तुम्ही इस्लामफोबिया, प्रचार, संघी, धर्मांध इत्यादी म्हणायला विसरला आहात. तुमची धर्मनिरपेक्ष प्रतिमा स्वत:च कलंकित करत आहात.
चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर भाजप समर्थक असल्याचा आरेप करण्यात आला आहे. द काशमीर फाईल्स या चित्रपटाबाबत एका अहवालाचा उल्लेखही विकिपीडिया केला आहे. त्यामध्ये पत्रकार राणा अय्युब आणि द वायरचे पत्रकार कौशिक राज यांचा उल्लेख आहे. द काश्मीर फाइल्स मुस्लिमांविरुद्ध द्वेषयुक्त प्रचार करत आहे, असे म्हटले आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विभाजनवादी राजकारणाचे प्रतिक असल्याचेही म्हटले आहे.
Now Wikipedia has also come down against the Kashmir Files movie, accusing it of being a conspiracy
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्रातल्या मनगटातील ताकद दाखवू; राज ठाकरेंची गर्जना!!
- Devendra Fadanavis : मशिदींवरचे भोंगे उतरवताना हातभर फाटली आणि म्हणे “यांनी” बाबरी मशीद पाडली!!; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!!
- AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!