• Download App
    गुगल ट्रान्सलेटरवर आता संस्कृत, कोकणी आणि भोजपुरीसह 8 नव्या प्रादेशिक भाषांचा समावेशNow Sanskrit, Konkani and Bhojpuri on Google Translator

    गुगल ट्रान्सलेटरवर आता संस्कृत, कोकणी आणि भोजपुरीसह 8 नव्या प्रादेशिक भाषांचा समावेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. भारतातल्या 8 नवीन प्रादेशिक भाषांचा गुगल ट्रान्सलेटरने समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी भाषांचाही समावेश आहे. त्यामुळे आता गुगल ट्रान्सलेटरवर भारतीय भाषांची संख्या १९ वर पोहचली आहे. Now Sanskrit, Konkani and Bhojpuri on Google Translator

    संस्कृत गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची

    गुगलच्या नवीन अपडेटनंतर गुगल ट्रान्सलेटर मध्ये संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येणार आहे. या अपडेटनंतर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये भाषांतर करता येणार आहे. बुधवारी उशिरा सुरू झालेल्या वार्षिक गुगल परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सध्या गुगल भाषांतर प्लॅटफॉर्मवर नवनवीन प्रादेशिक भाषा जोडत आहे.

    आसामी भाषा ईशान्य भारतातील सुमारे 2.5 कोटी लोक वापरतात. भोजपुरी सुमारे 5 कोटी लोक वापरतात. कोकणीमध्ये भारतातील सुमारे २० लाख लोक वापरतात. संस्कृत ही गुगल भाषांतरात प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत, असे गुगलच्या अभियंत्यांनी म्हटले आहे.

    Now Sanskrit, Konkani and Bhojpuri on Google Translator

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pay Commission : 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू होणार; कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत

    अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात मराठीचे फलक; पण JNU मधल्या मराठी अध्यासनाला विरोध!!