प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला अपलिंकिंग हब बनवण्यासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या उपग्रहांचे अपलिंकिंग एका महिन्याच्या आता नियंत्रणमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी येथील भारतीय अंतराळ परिषदेत केली. तसेच पुढील काही वर्षांमध्ये थेट मोबाईलवर दूरचित्रवाणी वाहिन्यांचे थेट प्रसारण शक्य होणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. Now live streaming of TV channels on mobile
अपलिंकिंगच्या नियंत्रणमुक्ती
चंद्रा म्हणाले की, मोबाईलवर टीव्ही सामग्रीचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने प्रसारभारती आणि आयआयटी कानपूर संशोधन करीत आहोत. यामुळे स्पेक्ट्रमचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल. दोन- तीन वर्षांत थेट मोबाईलवर प्रसारण ही एक वास्तविकता असू शकते, असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला.
सध्या मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दिसते. देशातील 562 वाहिन्या त्यांच्या सेवांच्या अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगसाठी परदेशी उपग्रहांचा वापर करतात. यासाठी सिंगापूरचा हब म्हणून वापर होतो. अपलिंकिंगच्या नियंत्रणमुक्तीमुळे भारत एक केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल, असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला आहे.
Now live streaming of TV channels on mobile
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री
- Maha RERA recruitment : सरकारी नोकरीची संधी; ६५ हजारांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज
- नोटांवर लक्ष्मी – गणेशाच्या प्रतिमा : केजरीवालांनी आधी वक्तव्य करून आजमावल्या प्रतिक्रिया, आता लिहिले मोदींना पत्र