वृत्तसंस्था
डेहराडून : उत्तराखंडने भूकंपाचा इशारा देणारे ॲप बनविण्याचा पहिले राज्य होण्याचा मान मिळविला आहे. उत्तराखंडचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण आणि रुरकीमधील आयआयटीने हे ॲप विकसित केले आहे. Now APP will give intimation regarding earthquake
भूकंपाच्या धक्क्यापूर्वी हे ॲप युजरना सावधानतेचा इशारा देते. त्याचप्रमाणे, भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली किंवा इतरत्र अडकलेल्या लोकांचे स्थान शोधण्यासाठीही ते मदत करते. संबंधित अधिकाऱ्यांनाही ते सावधान करते. या ॲपबद्दल जनजागृती करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री धामी यांनी केले. त्याचप्रमाणे, त्यासाठी शाळा व इतरत्र दाखविण्यासाठी लघुपट तयार करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
स्मार्टफोन नसणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा संदेश पाठविणाऱ्या फिचरचा ॲपमध्ये समावेश करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. ‘उत्तराखंड भूकंप अलर्ट’ या ॲपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उद्घाटन केले. ॲंड्राईड आणि आयओएस या दोन्हींवर हे ॲप उपलब्ध आहे.
Now APP will give intimation regarding earthquake
महत्त्वाच्या बातम्या
- ऑलिम्पिक पदकविजेत्या लोव्हलिनाला आसाम सरकार देणार अनोखी भेट, घराकडे जाण्यासाठी मिळणार पक्का रस्ता
- प्रियंका गांधी- वड्राच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, कॉँग्रेस स्वबळावरच सर्व जागा लढविणार
- राज्यातील वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचले, निती आयोगाचा अहवाल
- कडक सॅल्यूट ; दहावीमध्ये पाच विषयांत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या कुमार विश्वास सिंहला जायचेय लष्करात
- कोरोना बॅचला फटका बसण्यास सुरूवात, एचडीएफसी बँकेने चक्क जाहिरातीत म्हटले की कोरोना काळातील उत्तीर्णांनी अर्ज करू नयेत