• Download App
    आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण|Now another KGF, a gold mine found in Kotdi area of ​​Rajasthan

    आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण

    विशेष प्रतिनिधी

    राजस्थान : कर्नाटकातील केजीएफनंतर (कोलार गोल्ड फायनरी) आता दुसरी केजीएफ भारतात येत आहे. कोटडी गोल्ड फायनरी असे तिचे नाव असू शकते. याचे कारण राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे.Now another KGF, a gold mine found in Kotdi area of ​​Rajasthan

    2008 साली मिनरल एक्सप्लोरेशन कॉपोर्रेशननं कोटडी भागात सर्वेक्षण केलं. आता त्याचा अहवाल आला असून जमिनीत सोने आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचे स्पष्ट झालं आहे.जमिनीखाली 60 ते 160 मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे.



    या खाणीत 600 किलो सोनं आणि 250 टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.भूविज्ञान विभागानं या खाणीसाठी निविदा जारी केली आहे. त्यात ब्लॉकची किंमत 1 हजार 840 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. निविदेची बोली 128 कोटींपासून सुरू होईल.

    भीलवाडा जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठ्या दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी जस्ताची खाण जिल्ह्यातल्या आगूचा भागात आहे. त्यातच आता सोन्याची खाण मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

    Now another KGF, a gold mine found in Kotdi area of ​​Rajasthan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे

    Kerala : केरळ निवडणुकीच्या 3 महिने आधी दक्षिणेत कुंभ, पेशवाईसारखी रथयात्रा; 259 वर्षांपासून बंद महामाघ उत्सव परंपरा पुन्हा सुरू झाली