पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रई ममता बॅनर्जी देखील उद्याच्या बैठकीला अनुपस्थित असणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समाज वादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव उद्या 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत. I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांची ही चौथी बैठक असून यापूर्वीच्या तीनही बैठकांना अखिलेश उपस्थित होते. अखिलेश यादव यांच्या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा संबंध मध्य प्रदेश निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादाशी जोडला जात आहे. Now Akhilesh Yadav is also INDIA Will not go to tomorrows meeting
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतातील सर्व विरोधी २८ घटक पक्षांना बैठकीसाठी बोलावले आहे. यासंदर्भात त्यांनी अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली आहे. मात्र सपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव या बैठकीत सहभागी होणार नाहीत. तर, पक्षाच्या बाजूने मुख्य सरचिटणीस प्रा. राम गोपाल यादव सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.
भावी पंतप्रधान म्हणून अखिलेश यादव यांच्या पोस्टरवर कैलाश विजवर्गीय यांनी लगावला टोला, म्हणाले…
मध्य प्रदेशात निवडणूक आघाडी न करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर अखिलेश यादव यांनी सार्वजनिक मंचावरून टीका केली होती. यासंदर्भात रात्री उशीरा झालेल्या चर्चेनंतर शेवटच्या क्षणी जागा देण्यास नकार देणे म्हणजे विश्वासघात करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले होते. मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिलेश यांनी केवळ भाजपच नाही तर काँग्रेसवरही निशाणा साधला होता. भाजप आणि काँग्रेसमध्ये मूलभूत फरक नाही, असेही ते म्हणाले होते.