वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मनी लॉड्रिंग प्रकरणात तिहार जेलची हवा खात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रचंड गदारोळ झाला. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची यांनी सत्येंद्र जैन यांची पाठराखण केली आणि त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू असल्याचा दावा केला. परंतु हा दावा खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. Not the physiotherapist who massaged Satyendra Jain, but the rapist accused Rinku
कारण सत्तेंद्र जैन यांना मसाज देणारा मसाजिस्ट ईस्ट हा काही फिजिओथेरपिस्ट वगैरे नसून तो बलात्कारी आरोपी रिंकू असल्याचा जेल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रिंकू याच्यावर पॉस्को कायद्याखाली आणि 376, 506 आणि 509 कलमातंर्गत बलात्काराचे फौजदारी गुन्हे आहेत. त्याची शिक्षा तो भोगतो आहे. असा हा बलात्कार करणारा आणि त्याची शिक्षा भोगणारा आरोपी रिंकू हा सत्येंद्र जैन यांचा मसाज करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मात्र तरी देखील सत्येंद्र जैन यांचा बचाव करताना अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर डॉक्टरी सल्ल्यानुसार फिजिओथेरपी सुरू असल्याचा दावा केला होता. इतकेच नाही, तर सत्येंद्र जैन यांना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही, तर व्हीआयपी ट्रीटमेंट ही गुजरात दंगलीतील आरोपी अमित शाह हे जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा त्यांना मिळाली होती, असा कांगावा केजरीवाल्यांनी केला होता. परंतु, सत्येंद्र जैन यांच्या बाबतचा केजरीवालांचा दावा जेल प्रशासनाच्या खुलाशातून खोडून निघाला आहे तो खोटा ठरला आहे. आणि दंगलीची केस त्यांच्यावर होती