• Download App
    INDIA नव्हे, BHARAT च G20 मध्ये प्रश्न सुटला; मोदींसमोर लिहिले BHARAT!!; मोदींनीही वारंवार उल्लेख केला BHARAT!! Not INDIA, BHARAT solved the problem in G20

    INDIA नव्हे, BHARAT च G20 मध्ये प्रश्न सुटला; मोदींसमोर लिहिले BHARAT!!; मोदींनीही वारंवार उल्लेख केला BHARAT!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी G20 शिखर परिषदेत INDIA की BHARAT हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पद्धतीने सोडवला. Not INDIA, BHARAT solved the problem in G20

    शिखर परिषदेतील व्यासपीठावर त्यांच्या आसनासमोर INDIA नव्हे, तर BHARAT असेच लिहिले होते, तर मोदींनी आपल्या भाषणात INDIA नव्हे, तर BHARAT असाच उल्लेख केला. त्यांच्या सर्व भाषणांमध्ये जेव्हा जेव्हा देशाचा उल्लेख आला तो उल्लेख INDIA नव्हे, तर BHARAT असाच आला.

    लोहस्तंभावरील जागतिक कल्याणाच्या प्राकृत मंत्राच्या उच्चाराने मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भारत मंडपम् पासून हा लोहस्तंभ अवघ्या अडीच किलोमीटरच्या अंतरावर असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

    मात्र संपूर्ण देशात विरोधकांनी तयार केलेल्या इंडिया की भारत या वादाला मोदींनी G20 परिषदेत कृतीतून उत्तर दिले. G20 परिषदेत अधिकृतरित्या आफ्रिकन युनियनचा समावेश झाल्यानंतर ही परिषद केवळ G20 न राहता G21 बनली. आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना या परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्यात आले आहे.

    मोदींनी आपल्या भाषणात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही लोकप्रिय घोषणा मंत्राच्या रूपाने G21 परिषदेला दिली. पण मोदींच्या संबोधनातला वारंवार “भारत” हा उल्लेख हे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले!!

    Not INDIA, BHARAT solved the problem in G20

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bilawal Bhutto : आता बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानचा गुन्हा कबूल केला, म्हणाले

    Supreme Court : वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या नवीन याचिकांवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगदरम्यान मोठी दुर्घटना टळली