• Download App
    लसींचे कॉकटेल नाही, कोव्हिशिल्डचाही एकच नव्हे तर बारा आठवड्याच्या अंतराने दोन डोस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट|Not a cocktail of vaccines, not even a single dose of Covishield, but two doses every twelve weeks, the Union Ministry of Health clarified

    लसींचे कॉकटेल नाही, कोव्हिशिल्डचाही एकच नव्हे तर बारा आठवड्याच्या अंतराने दोन डोस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट

    लसीकरणाच्या धोरणामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे किंवा दोन लसींचे कॉकटेल करणे याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोव्हिशिल्ड लसीचे बारा आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देणे सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच दिले जाणार आहेत.Not a cocktail of vaccines, not even a single dose of Covishield, but two doses every twelve weeks, the Union Ministry of Health clarified


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लसीकरणाच्या धोरणामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे किंवा दोन लसींचे कॉकटेल करणे याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    कोव्हिशिल्ड लसीचे बारा आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देणे सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच दिले जाणार आहेत.
    कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये असलेल्या अंतरामध्ये कोणताही निर्णय झाला नाही.



    त्याचबरोबर दोन डोस देणेच आवश्यक आहे. पहिला डोस दिल्यानंतर बारा आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाईल. कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच आवश्यक असून त्यांच्यातील अंतर चार ते सहा आठवडे असणार आहे, असे निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. विनोद पॉल यांनी सांगितले.

    कोव्हिशिल्ड लसीचा एकच डोस पुरेसा आहे अशी अफवा पसरविली जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. कृपया या प्रकारची चुकीची माहिती पसरवू नका असे आवाहन पॉल यांनी केले आहे.

    लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की लसीचा एकच डोस पुरेसा आहे का यावर संशोधन सुरू आहे.

    त्यानंतर आता कोव्हिशिल्डचा एकच डोस दिला जाणार असल्याची अफवा पसरली होती.दोन लसी एकत्र करून त्याचे कॉकटेल तयार करण्याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. याचा अद्याप कोणताही निकाल आलेला नाही.

    शास्त्रीय दृष्टया हे अद्याप सिध्द झालेले नाही. त्यामुळे दोन लसी मिसळल्या जाणार नाही. शास्त्रज्ञ यावर अभ्यास करत असले त्यावरील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरू असलेली पध्दतच सुरू राहणार असल्याचे डॉ. पॉल यांनी सांगितले.

    Not a cocktail of vaccines, not even a single dose of Covishield, but two doses every twelve weeks, the Union Ministry of Health clarified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था

    पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!