लसीकरणाच्या धोरणामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे किंवा दोन लसींचे कॉकटेल करणे याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कोव्हिशिल्ड लसीचे बारा आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देणे सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच दिले जाणार आहेत.Not a cocktail of vaccines, not even a single dose of Covishield, but two doses every twelve weeks, the Union Ministry of Health clarified
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लसीकरणाच्या धोरणामध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डचा एकच डोस पुरेसा आहे किंवा दोन लसींचे कॉकटेल करणे याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोव्हिशिल्ड लसीचे बारा आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देणे सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच दिले जाणार आहेत.
कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये असलेल्या अंतरामध्ये कोणताही निर्णय झाला नाही.
त्याचबरोबर दोन डोस देणेच आवश्यक आहे. पहिला डोस दिल्यानंतर बारा आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाईल. कोव्हॅक्सिनचेही दोन डोसच आवश्यक असून त्यांच्यातील अंतर चार ते सहा आठवडे असणार आहे, असे निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. विनोद पॉल यांनी सांगितले.
कोव्हिशिल्ड लसीचा एकच डोस पुरेसा आहे अशी अफवा पसरविली जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. कृपया या प्रकारची चुकीची माहिती पसरवू नका असे आवाहन पॉल यांनी केले आहे.
लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की लसीचा एकच डोस पुरेसा आहे का यावर संशोधन सुरू आहे.
त्यानंतर आता कोव्हिशिल्डचा एकच डोस दिला जाणार असल्याची अफवा पसरली होती.दोन लसी एकत्र करून त्याचे कॉकटेल तयार करण्याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. याचा अद्याप कोणताही निकाल आलेला नाही.
शास्त्रीय दृष्टया हे अद्याप सिध्द झालेले नाही. त्यामुळे दोन लसी मिसळल्या जाणार नाही. शास्त्रज्ञ यावर अभ्यास करत असले त्यावरील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरू असलेली पध्दतच सुरू राहणार असल्याचे डॉ. पॉल यांनी सांगितले.
Not a cocktail of vaccines, not even a single dose of Covishield, but two doses every twelve weeks, the Union Ministry of Health clarified
महत्त्वाच्या बातम्या
- राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल
- मोदींना घायाळ करणारी 6 वर्षांच्या ‘काश्मिरी कळी’ची गोड गळ
- बौद्ध विद्येतील योगदानाबद्दल पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा सन्मान संस्थेचा
- अहंकाराने केला जनसेवेचा पराभव, राज्यपाल धनखड यांची ममतांवर टीका
- सीबीएसईच्या बारावी परीक्षा रद्द : मोदींनी घेतला निर्णय उद्धव कधी घेणार?