• Download App
    उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण|North Korea fires long-range missile again, flies 1,000km before hitting target

    उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर कोरियाने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आंतरखंडीय क्षेपणास्त्र (ICBM) डागले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्योंगयांग येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.10 वाजता सोडण्यात आले आणि कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील सागरी क्षेत्रामध्ये उड्डाण केले. तर जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे क्षेपणास्त्र जपानच्या बेटापासून 250 किमी अंतरावर पडले. यापूर्वी ते सुमारे 70 मिनिटे 6,000 किमी पेक्षा जास्त उंचीवर सुमारे 1,000 किमी उड्डाण करत होते.North Korea fires long-range missile again, flies 1,000km before hitting target

    क्षेपणास्त्र डागण्याची कृती ही संयुक्त राष्ट्राच्या ठरावांच्या विरोधात असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे. या चिथावणीची किंमत उत्तर कोरियाला चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. दक्षिण कोरियाने जपान आणि अमेरिकेसोबत मजबूत सुरक्षा सहकार्याचे आवाहन केले आहे.



    मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्षेपणास्त्र चाचणीनंतर जपान आणि दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी करू शकतात. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावांमध्ये उत्तर कोरियाने अनेकदा क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्याचवेळी प्योंगयांगने या लष्करी सरावाचा निषेध केला आहे.

    दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. टोकियो येथे होणाऱ्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ते उत्तर कोरिया आणि इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या सहकार्यावर चर्चा करणार आहेत.

    North Korea fires long-range missile again, flies 1,000km before hitting target

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल