• Download App
    उत्तर कोरियाने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, हुकूमशहा किम जोंगच्या पावलामुळे जपान सावध, जहाजांसाठी अलर्ट जारी । North Korea fired ballistic missile, Japan issued an alert for its ships

    उत्तर कोरियाने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, हुकूमशहा किम जोंगच्या पावलामुळे जपान सावध, जहाजांसाठी अलर्ट जारी

    उत्तर कोरियाने मंगळवारी आपल्या पूर्व किनाऱ्यावरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ (जेसीएस) च्या मते, क्षेपणास्त्र दक्षिण हॅमग्योंग प्रांतातील सिनपोच्या आसपास पूर्वेकडे सोडण्यात आले. हे प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी 06.45 च्या सुमारास आढळले. North Korea fired ballistic missile, Japan issued an alert for its ships


    वृत्तसंस्था

    सेऊल : उत्तर कोरियाने मंगळवारी आपल्या पूर्व किनाऱ्यावरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ (जेसीएस) च्या मते, क्षेपणास्त्र दक्षिण हॅमग्योंग प्रांतातील सिनपोच्या आसपास पूर्वेकडे सोडण्यात आले. हे प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी 06.45 च्या सुमारास आढळले.

    योनहॅप या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचे गुप्तचर अधिकारी अधिक माहितीसाठी याचे विश्लेषण करत आहेत. हे प्रक्षेपण अशा वेळी झाले जेव्हा दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानचे उच्च आण्विक दूत उत्तर कोरियाशी चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या संयुक्त प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आहेत. उत्तर कोरियाला मानवतावादी मदत आणि इतर प्रोत्साहनांद्वारे वाटाघाटी करण्यास प्रवृत्त करावे अशी तिन्ही देशांची इच्छा आहे.



    अमेरिका कोणत्याही अटीशिवाय वाटाघाटी करण्यास तयार

    उत्तर कोरियासाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी सुंग किम म्हणाले की, ते या आठवड्यात चर्चेसाठी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला भेट देतील. सोमवारी वॉशिंग्टनमध्ये दक्षिण कोरियाच्या समकक्षांशी भेटल्यानंतर किम म्हणाले, ‘अमेरिकेला उत्तर कोरियाशी पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. आम्ही त्याला बिनशर्त भेटायला तयार आहोत.

    उत्तर कोरिया लष्कर मजबूत करण्याच्या मागे

    उत्तर कोरिया आपले लष्कर वेगाने वाढवत आहे. यापूर्वी उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये नवीन प्रकारच्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा समावेश आहे.

    जपानच्या पंतप्रधानांकडून निवडणूक प्रचार रद्द

    दुसरीकडे, उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणीमुळे जपानच्या निवडणूक प्रचारावर परिणाम झाला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी उत्तर कोरियाकडून अलीकडच्या काळात केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचे वर्णन खेदजनक आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर पीएम किशिदा यांनी उत्तर जपानमध्ये आयोजित केलेली मोहीम रद्द केली. जपानी तटरक्षक दलाने क्षेपणास्त्र चाचणीमुळे जहाजांसाठी मरीन सेफ्टी अलर्ट जारी केला आहे.

    North Korea fired ballistic missile, Japan issued an alert for its ships

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज