• Download App
    Jagdeep dhankhad

    उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर नुसतेच तर्क वितर्क; कुणालाच जाता येईना खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर राजधानी नवी दिल्ली सकट संपूर्ण देशातल्या राजकीय वर्तुळात नुसतेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. पण प्रत्यक्षात कुणालाच त्यांच्या राजीनामाच्या खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत जाता आले नाही. Jagdeep dhankhad

    जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांचे पेव फुटले. पण खुद्द त्यांच्याकडून आणि सरकारकडून कुठलीच अधिकृत जास्तीची माहिती देण्यात आली नाही. धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर 12 तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून त्यांना शुभकामना दिल्या. यात त्यांनी धनखड यांच्या देशसेवेची दखल घेतली. त्या पलीकडे काही सांगितले नाही.

    पण त्याचवेळी धनखड यांच्या राजीनाम्याबाबत त्यांचे सरकारशी असलेले मतभेद इथपासून ते त्यांची तब्येत इथपर्यंत अनेकांनी ठोकून वेगवेगळे दावे केले. शेतकरी आंदोलनापासून ते न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोगापर्यंतच्या विषयांवर जगदीप धनखड आणि मोदी सरकारमध्ये मतभेद असल्याचा दावा अनेकांनी केला. त्याच्या वेगवेगळ्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. त्याचबरोबर राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात काही खासदारांच्या कोऱ्या सह्या घेतल्या गेल्याचाही दावा अनेकांनी केला.



    राज्यसभेचे नेते आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी धनखड यांना बाजूला करून स्वतः म्हणतील तेच रेकॉर्डवर जाईल असे म्हटल्याचा दावाही बातम्यांमधून करण्यात आला पण प्रत्यक्षात आपण काढलेले उद्गार हे गोंधळ करणाऱ्या विरोधी खासदारांच्यासाठी होते. ते राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून काढलेले उद्गार नव्हते, असा खुलासा नड्डा यांनी केला.

    काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी वेगवेगळी ट्विट करून संशय वाढविला पण त्यांनाही धनखड यांच्या राजीनाम्याची खरी माहिती सांगता आली नाही.

    जगदीप धनखड यांच्या राजीनामे संदर्भात माध्यमाने वेगवेगळ्या थिअरी चालविल्या. पण त्या मागचे सत्य कुठल्याच माध्यमाला सांगता आले नाही.

    वर उल्लेख केलेले सर्व तर्कवितर्क केवळ अनुमानावर आधारित होते यामध्ये नेमके तथ्य काय हे कुणीच सांगितले नाही. त्यामुळे
    यापैकी कुणालाही जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत जाता आले नाही. कारण स्वतः धनखड यांनी त्या संदर्भात कुठलाही खुलासा केला नाही.

    Nobody knows the real reason behind Jagdeep dhankhad’s resignation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांचा आरोप- माझे आणि पत्नीचे नाव मतदार यादीतून काढले; आयोगाने फेटाळला दावा

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- भारताची निवडणूक व्यवस्था मृत झाली; लोकसभा निवडणुकीत 15 जागांवर हेराफेरी

    Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; कोर्टाने काल दोषी ठरवले होते; मोलकरणीचे केले होते शोषण