• Download App
    Noble prize नोबेलच्या ecosystem ने उतावळ्याचा हिरावला पुरस्कार!!

    नोबेल समितीने हिरावला उतावळ्याचा पुरस्कार; पण वाचा नोबेल ecosystem चा चमत्कार!!

    अमेरिकेचे उतावळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही. त्यांनी पाच – दहा युद्ध थांबविल्याचा दावा केला, तरी तो नोबेल पुरस्कार समितीने मानला नाही. त्या उलट त्यांनी व्हेनेझुएलाच्या महिलेला नोबेल शांतता पुरस्कार दिला.

    कारण वास्तवात डोनाल्ड ट्रम्प नावाचे उतावळे राष्ट्राध्यक्ष नोबेल पुरस्काराच्या ecosystem मध्ये fit बसले नाहीत. नोबेल पुरस्काराची किंबहुना बुकर सारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची एक विशिष्ट ecosystem आहे. ती system तुम्ही follow केली तर तुम्हाला ते पुरस्कार मिळू शकतात. त्या पलीकडे जाऊन system मध्ये न बसणाऱ्यांना नोबेल किंवा बुकर पुरस्कार मिळत नाहीत. तिथे गुणवत्तेचा फारसा संबंध नाही. संबंध आहे तो अतिउच्च दर्जाच्या भाषेचा आणि तोंडावर मानवतावादी मुखवटा चढविण्याचा!!

    – कृतीची बोंब चालेल, पण मानवतावादी भाषा आवश्यक

    तुम्ही अतिउच्च दर्जाची मानवतावादी भाषा वापरली, मानवतावादाचा मुखवटा चेहऱ्यावर ओढला किंवा मानवतावादाचा व्यवस्थित मेकअप किंवा मेक ओव्हर केला, की तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळायला फारशी अडचण राहात नाही. बराक ओबामा, मलाला, मोहम्मद युनूस, अमर्त्य सेन, अरुंधती रॉय, बानू मुश्ताक ही त्याची काही इतिहासातली उदाहरणे पाहिली की नोबेल पुरस्काराची आणि बुकर पुरस्कारांची ecosystem लक्षात येते. हे सगळे एकतर नोबेल पुरस्कार विजेते आहेत किंवा बुकर पुरस्कार विजेते आहेत. यापैकी सगळ्यांची भाषा “कमावलेली” अतिशय उच्च दर्जाची आणि मानवतावादाचीच होती आणि आहे, पण त्यांचे प्रत्यक्ष नंतरचे कर्तृत्व किंवा आधीचे कर्तृत्व याचा त्या भाषेशी काहीही संबंध नव्हता. उलट बराक ओबामा, मोहम्मद युनूस अमर्त्य सेन, अरुंधती रॉय, बानू मुश्ताक हे नोबेल\बुकर पुरस्कार विजेते इस्लामी जिहाद्यांचे समर्थन करत राहिले, फुटीरतावाद्यांना पाठिंबा देत राहिले आणि राष्ट्रवादी विचारांना ठोकत राहिले. अनेकांनी आर्थिक भ्रष्टाचार केला, पण सगळ्यांनी तोंडी मानवतावादी भाषा वापरण्याचे नोबेलच्या ecosystem चे पथ्य बरोबर पाळले. त्यात त्यांनी कुठली कमी ठेवली नाही.



     ओबामांना मिळाला, नेहरूंना नाही

    वर उल्लेख केलेल्या सगळ्यांना पुरस्कार मिळाले कारण नोबेल पुरस्काराच्या समितीला अशा लोकांच्या प्रत्यक्ष वर्तणुकीशी काही देणे घेणे नसते. मग मोहम्मद युनूस आणि अमर्त्य सेन यांनी आर्थिक गैरव्यवहार करून जमिनी लाटल्या तरी चालतात. मोहम्मद युनूसच्या राजवटीत हिंदूंचे शिरकाण झाले तरी चालते किंवा अरुंधती रॉय आणि बानू मुश्ताक यांनी कट्टर इस्लामी जिहादीस्टांची बाजू उचलून धरली तरी चालते. नोबेल पुरस्कार समिती कुठल्याही नोबेल विजेत्याच्या कृतीवर आक्षेप घेत नाही. किंवा तो पुरस्कार वापसही घेत नाही.

    – नोबेलची ecosystem

    ज्याला पुरस्कार पाहिजे त्याने फक्त उच्च दर्जाची मानवतावादी भाषा वापरून जागतिक शांततेविषयी सतत बोलत राहिले पाहिजे. तशी प्रतिमा निर्मिती करत राहिले पाहिजे याकडे नोबेल समिती कटाक्षाने लक्ष देते, पण संबंधित व्यक्ती तेवढी ठोस कृती करते का??, तिचे बोलणे आणि वर्तन समान असते का??, हे पाहण्याची जबाबदारी नोबेल समितीची नाही. कारण तशा कुठल्या अटी शर्ती नोबेल समिती खऱ्या अर्थाने घालतच नाही. अन्यथा बराक ओबामांसारख्या काहीही न केलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सहज नोबेल शांतता पुरस्कार मिळूच शकला नसता. किंवा मदर तेरेसा मानव सेवेच्या नावाखाली धर्मांतराचे रॅकेट चालवतात हे नोबेल पुरस्कार समितीने सहनच केले नसते. त्यांना कधी नोबेल पुरस्कार दिला नसता. पण दोघांनाही शांततेचा नोबेल पुरस्कार दिला. याचा अर्थच ते नोबेलच्या ecosystem मध्ये fit बसले.

    तसा प्रयत्न आधीच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा केला होता. पंडित नेहरूंना देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच नोबेल पुरस्काराची आस लागून राहिली होती. परंतु पंडितजींना तो पुरस्कार मिळू शकला नाही. वास्तविक नोबेल पुरस्काराच्या विशिष्ट अटी आणि शर्तींमध्ये पंडितजी fit बसत होते. भारत त्यावेळी दुबळा होता, तरी पंडितजींच्या तोंडी कायम जागतिक शांततेची भाषा होती. त्यासाठी भारताच्या हिताचा बळी देण्याची त्यांची तयारी होती. तसा त्यांनी तो दिलाही, पण तरीसुद्धा पंडितजींना नोबेल शांतता पुरस्कार मिळू शकला नाही.

    – डोनाल्ड ट्रम्प misfit

    डोनाल्ड ट्रम्प ही तर त्यांच्या उथळ वागणुकीमुळे नोबेलच्या पुरस्कार निकषात बसतच नव्हते. उगाच रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी पाच – दहा युद्ध थांबविली असे म्हणणे वेगळे आणि खरी युद्ध थांबणे वेगळे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. बराक ओबामांना काही न करता नोबेल शांतता पुरस्कार मिळू शकतो, तर मला का मिळू शकत नाही??, हा त्यांचा सवाल अर्धा बरोबर होता, पण बराक ओबामा ज्या पद्धतीने जागतिक शांततेचा आव आणणारी भाषणे करत होते, तशी भाषणे डोनाल्ड ट्रम्प यांनी केली नाहीत‌. उलट ते रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन वादग्रस्त निर्णय अमेरिकन नागरिकांवर आणि जगातल्या इतर देशांवर लादत राहिले. भारतासारख्या मित्र देशाला त्यांनी दुखावले. जागतिक हवामान बदला संदर्भात निर्णय भूमिका घेणे अपेक्षित असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या स्वार्थाची भूमिका घेतली. त्यांनी युद्ध थांबविण्याची भाषा केली, पण जागतिक शांततेची भाषा करण्याऐवजी अफगाणिस्तानात पुन्हा आक्रमण करायची तयारी चालविली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणे तसे दुरापास्तच होते आणि त्यांना तो मिळालाही नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पुरस्काराच्या ecosystem मध्ये fit बसले नाहीत.

    Noble prize ecosystem, only speaks high moral ground, without concrete action

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : 272 निवृत्त न्यायाधीश-नोकरशहांचे राहुल गांधींना पत्र, म्हटले- काँग्रेस ECची प्रतिमा मलिन करत आहे

    PM Kisan Samman Nidhi : मोदींनी किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता जारी केला, 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी ट्रान्सफर, नैसर्गिक शेतीवर जोर

    PM Modi : PM मोदी जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार, अनेक द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहणार