मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॉर्वेस्थित नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. समितीने सांगितले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या दोघांनाही या वर्षीच्या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Nobel Peace Prize Maria Ressa and Dmitry Muratov awarded with Nobel Peace Prize 2021
वृत्तसंस्था
स्टॉकहोम : मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॉर्वेस्थित नोबेल समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. समितीने सांगितले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या दोघांनाही या वर्षीच्या शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोबेल समितीच्या मते, लोकशाही आणि जगातील शांततेसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार जागतिक अन्न कार्यक्रमाला देण्यात आला होता, जो 1961 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष ड्वाइट आइश्नोव्हर यांनी सुरू केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश जगातील प्रत्येकाला अन्न पुरवणे हा होता.
कोण आहेत मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह?
नॉर्वेमधील नोबेल समितीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, रेसा यांनी आपला देश फिलीपिन्समध्ये सत्तेचा गैरवापर, हिंसा आणि हुकूमशाहीचा वापर या बाबी समोर आणण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर केला होता. 2012 मध्ये मारिया यांनी रॅपलरची स्थापना केली. त्या या डिजिटल मीडिया कंपनीच्या सह-संस्थापक आहेत आणि ही कंपनी शोध पत्रकारिता करते.
दुसरीकडे, दिमित्री अँड्रीविच मुराटोव्ह हेदेखील एक पत्रकार आहे. त्यांनी रशियामध्ये नोवाजा गझेटा नावाच्या वृत्तपत्राची सह-स्थापना केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, हे आजपर्यंतचे रशियातील सर्वात स्वतंत्र वृत्तपत्र आहे. नोबेल समितीच्या मते, मुरातोव्ह कित्येक दशकांपासून रशियामध्ये भाषण स्वातंत्र्याचे रक्षण करत आहे.
त्यांच्याच देशात अनेक आव्हानात्मक परिस्थिती असतानाही त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बुलंद केलेला आहे. सत्तेचा गैरवापर, असत्य आणि युद्धप्रचार उघड करण्यासाठी मुक्त, स्वतंत्र आणि वस्तुस्थितीवर आधारित पत्रकारिता आवश्यक आहे यावर समितीने भर दिला.
Nobel Peace Prize Maria Ressa and Dmitry Muratov awarded with Nobel Peace Prize 2021
महत्त्वाच्या बातम्या
- प्रवाशांनो सावधान ! मास्क घातला नाही तर भरावा लागल ५०० रुपये दंड, रेल्वे मंत्र्याने जाहीर केले कडक नियम
- Uk on covishield : ११ ऑक्टोबरपासून कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीयांचे क्वारंटाइन बंद ; ब्रिटिश उच्चायुक्त एलिस यांनी केले ट्विट
- मनी मॅटर्स : नॅशनल पेन्शन सिस्टिम हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकाचे काम चालते तरी कसे?