• Download App
    जम्मू- काश्मीकरमधील राजधानी हलविण्याची प्रथा अखेर रद्द, मोठी आर्थिक बचत |No shifting capital in Jammu and Kashmir in future

    जम्मू- काश्मीकरमधील राजधानी हलविण्याची प्रथा अखेर रद्द, मोठी आर्थिक बचत

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू  : जम्मू- काश्मीकरमधील १४९ वर्षांपासून चालत आलेली राजधानी हलविण्याची प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.ही प्रथा बंद झाल्यामुळे पैसा, वेळ आणि संसाधनांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या प्रथेमुळे जम्मू ते श्रीनगर अशी रस्ते मार्गानेच शासकीय कामकाजाच्या फायलींची वाहतूक करावी लागत असे.No shifting capital in Jammu and Kashmir in future

    डोगरा राजवटीमध्ये १८७२ साली सुरू झालेली ही प्रथा १९४७ साली स्वातंत्र्यानंतरही तशीच चालू ठेवण्यात आली होती. महाराज गुलाबसिंग हे या प्रथेचे जनक मानले जातात. त्यांच्याच काळामध्ये श्रीनगर उन्हाळी तर जम्मू पावसाळी राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



     

    या प्रथेमुळे जम्मू-काश्मीीरमधील दोन वेगवेगळ्या भागांतील भाषक आणि सांस्कृतिक बंध अधिक मजबूत होतात असा दावा केला जात असे.मात्र या जुन्या प्रथेमुळे आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत असे.

    शिवाय त्याचा प्रचंड आर्थिक बोजा पडत असे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल व न्या. राजनेश ओसवाल यांनी या प्रथेस, ‘व्यवस्थेवर ताण आणणारी प्रथा’ म्हणत ती बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.

    No shifting capital in Jammu and Kashmir in future

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indigo : इंडिगोवर ₹458 कोटींहून अधिकचा जीएसटी दंड; एअरलाइनने म्हटले- आदेशाला आव्हान देणार

    Ujjain Mahakal : उज्जैन महाकाल दर्शन घेऊन नुसरत भरुचा वादात; ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष म्हणाले- हा शरियतच्या दृष्टीने गुन्हा, तौबा करा, कलमा वाचा

    Army Animal : प्रजासत्ताक दिनी सैन्याची पशु तुकडी देखील परेड करणार; बॅक्ट्रियन उंट, झांस्कर टट्टू, रॅप्टर्स आणि श्वान मार्च करतील