• Download App
    कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीमध्ये गायीच्या वासराचे सीरम नाही, सोशल मिडीयावरील प्रचार चुकीचा। No serum in Covaxine

    कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीमध्ये गायीच्या वासराचे सीरम नाही, सोशल मिडीयावरील प्रचार चुकीचा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या सीरमचा (रक्तामधील पातळ प्रथिन द्रव) समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियातील पोस्ट चुकीच्या असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. No serum in Covaxine

    मानवी शरीरारातील व्हेरो सेल्सच्या निर्मितीबरोबरच त्यांच्या वाढीसाठी गायीच्या नवजात बछड्याच्या सीरमचा वापर करावा लागतो. सर्वसाधारणपणे गोवंशातील प्राण्यांच्या शरीरातूनच हे सीरम काढले जाते, जगभर त्याचा वापर हा व्हेरो सेल्सच्या वाढीसाठी केला जातो. पोलिओ, रेबीज आणि हिवतापावरील विविध लशींच्या निर्मितीसाठी याच तंत्राचा वापर करण्यात येतो असा दावा संबंधित पोस्टमध्ये करण्यात आला होता.



    याबाबत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहेकी, मृत झालेल्या आणि निष्क्रिय विषाणूचा नंतर शेवटच्या टप्प्यातील लस तयार करण्यासाठी वापर केला जातो. येथे कोठेही वासराच्या सीरमचा वापर केला जात नाही, त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या निर्मितीमध्येही त्याचा समावेश नाही.

    लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका कुशंका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकराच्या अफवांचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेवरदेखील विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे मानले जाते.

    No serum in Covaxine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही