• Download App
    उजव्या हातावर टॅटू काढा; ITBP त नोकरी विसरा!!; पंजाब हरियाणा हायकोर्टाचा निकाल|No selection in ITBP if tattoo on right arm: Punjab and Haryana HC

    उजव्या हातावर टॅटू काढा; ITBP त नोकरी विसरा!!; पंजाब हरियाणा हायकोर्टाचा निकाल

    वृत्तसंस्था

    चंडीगड : उजव्या हातावर टॅटू काढा; ITBP त नोकरी विसरा!!; असा निकाल पंजाब हरियाणा हायकोर्टाने दिला आहे. उमेदवाराच्या सलामीच्या उजव्या हातावर टॅटू असेल, तर ITBP अर्थात इंडो तिबेटियन पोलीस बॉर्डर फोर्स मध्ये नोकरी मिळणार नाही असा हा निकाल आहे.No selection in ITBP if tattoo on right arm: Punjab and Haryana HC



    या खटल्याची कहाणी अशी :

    ITBP अर्थात इंडो तिबेटियन पोलीस बॉर्डर फोर्स ने भरतीसाठी 2021 मध्ये जाहिरात दिली होती त्यामध्ये उमेदवाराच्या अंगावर विशेषतः सलामी देणाऱ्या उजव्या हातावर टॅटू असेल तर त्याला अपात्र ठरवण्यात येईल, असे स्पष्ट नमूद केले होते. त्यानुसार मोनू नावाच्या एका उमेदवाराला चाचणीतच अपात्र ठरवण्यात आले होते.

    परंतु या मोनूने टॅटू हा इलाज करून काढून टाकण्यासारखा विकार आहे, असा युक्तिवाद करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली. त्यावर केंद्र सरकारने युक्तीवाद केला की मूळात उमेदवाराने भरती प्रक्रियेच्या वेळीच पात्रतेच्या अटी शर्तींचा भंग केला आहे. त्यावेळी त्याच्या उजव्या दंडावर टॅटू होता. त्यामुळे त्याला फिजिकल फिटनेसच्या चाचणीच्या वेळीच अपात्र ठरविले होते. त्यानंतर हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन संबंधित उमेदवाराला भरती मध्ये अपात्र ठरवण्याचा निकाल दिला. त्यामुळे उजव्या हातावर टॅटू काढा पण ITBP त नोकरी विसरा!!, असे झाले आहे.

    No selection in ITBP if tattoo on right arm: Punjab and Haryana HC

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत