विशेष प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकात मराठा समाजाला इतर मागास वर्ग ‘३ बी’ प्रवर्गातून ‘२ ए’ प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी कर्नाटक राज्य इतर मागासवर्ग आयोगाने फेटाळली आहे. No reservation to Maratha in Karnataka
बंगळूर येथील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे अध्यक्ष सुरेश साठे यांनी राज्य इतर मागास वर्ग आयोगाकडे याबाबतचे निवेदन पाठविले होते. त्यावर आयोगाने साठे यांना पत्र पाठविले असून यात ही मागणी फेटाळण्यात आली आहे. साठे यांनी १७ जून २०१९ रोजी आयोगाला कर्नाटकातील मराठा समाजाला प्रवर्ग ‘३ बी’ मधून ‘२ ए’ मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती.
त्यास आयोगाने नुकतेच पत्राद्वारे उत्तर पाठविले असून यात, राज्य इतर मागास वर्ग आयोगाचे मागील अध्यक्ष शंकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मराठा समाजाला २ ए मध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचे आठ सल्ले आणि सूचना असलेला अहवाल २०१२ साली कर्नाटक सरकारला पाठविला आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आयोगाकडून अधिनियम १९९५ अ नुसार पुन्हा त्याच मागणीवरील अर्जाची पुनर्रपडताळणी करता येत नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
No reservation to Maratha in Karnataka
महत्त्वाच्या बातम्या
- महामारीशी लढण्यास अर्थव्यवस्था शिकली, अल्पावधीत रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल : आरबीआय एमपीसी सदस्य
- अमरुल्लाह सालेह यांचा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा पवित्रा, गार्डला म्हणाले – “जखमी झालो, तर थेट माझ्या डोक्यात गोळी मारा”
- पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर
- Teachers Day : शिक्षकदिनी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांसह 44 जणांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपतींचे बोधप्रद भाषण, वाचा सविस्तर…