• Download App
    अंगकिता प्रकरणात बीव्ही श्रीनिवास यांना दिलासा नाहीच, युवक काँग्रेस अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला|No relief for BV Srinivas in Angkita case, Youth Congress President's pre-arrest bail application rejected by High Court

    अंगकिता प्रकरणात बीव्ही श्रीनिवास यांना दिलासा नाहीच, युवक काँग्रेस अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अंगकिता दत्ता प्रकरणात अडकलेले भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांना उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. श्रीनिवास यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. श्रीनिवास यांच्यावर आसाम युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अंगकिता दत्ता यांचा छळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अंगकिता दत्ता यांनी श्रीनिवास यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.No relief for BV Srinivas in Angkita case, Youth Congress President’s pre-arrest bail application rejected by High Court

    श्रीनिवास यांच्यावर काय आहेत आरोप?

    आसाम युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अंगकिता दत्ता यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याबद्दल 22 एप्रिल रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर अंगकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्याविरोधात आसाममधील दिसपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. श्रीनिवास यांच्याकडून पीडितेचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.



    पीडितेला आरोपींकडून धक्काबुक्की आणि धमकावले जात होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर पीडित अंगकिता दत्ता यांनी श्रीनिवास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    पीडितेच्या वकिलाने जामिनाला विरोध केला

    श्रीनिवास यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील के.एन.चौधरी म्हणाले की, युवक काँग्रेसच्या अध्यक्षाविरुद्ध त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच अंगकिता दत्ताने सोशल मीडियावर श्रीनिवास यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे आहे की, श्रीनिवास यांनी बंगळुरू न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, परंतु तिथूनही ती फेटाळण्यात आली. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यावर एका महिलेच्या विनयभंगाचा आरोप आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही.

    No relief for BV Srinivas in Angkita case, Youth Congress President’s pre-arrest bail application rejected by High Court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य