• Download App
    ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये 'कलम ३७०' परत आणू शकत नाही - पंतप्रधान मोदी|No Power in the universe can bring back Article 370 in Jammu and Kashmir PM Modi

    ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ परत आणू शकत नाही – पंतप्रधान मोदी

    • संसदेतील घुसखोरीच्या घटनेवरही व्यक्त केली आहे चिंता

    विशेष प्रतिनिधी

    आता सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधी पक्षांसह काश्मीरमधील पक्षांनी कलम 370 हटवण्यासाठी दीर्घ लढाई लढण्याची चर्चा केली आहे.No Power in the universe can bring back Article 370 in Jammu and Kashmir PM Modi

    पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर अद्यापपर्यंत थेट काहीही बोललेले नव्हते. परंतु आता त्यांनी विश्वातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकत नाही, असं मोठं विधान केलं आहे.



    एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा सकारात्मक वापर करू. पीएम मोदी म्हणाले, “विश्वातील कोणतीही शक्ती आता कलम 370 परत आणू शकत नाही. त्यामुळे आता आम्ही त्याचा सकारात्मक कामासाठी वापर करू.”

    याशिवाय, मोदींनी संसदेतील घुसखोरीची घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आणि त्याच्या तळापर्यंत तपास करण्याचेही म्हटले आहे. संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य अजिबात कमी लेखू नये, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी पूर्ण गांभीर्याने आवश्यक ती पावले उचलली आहेत. तपास यंत्रणा काटेकोरपणे तपास करत आहे. यामागे कोणते घटक आणि हेतू आहेत, याच्या खोलात जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असेही मोदी म्हणाले.

    No Power in the universe can bring back Article 370 in Jammu and Kashmir PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!