• Download App
    देशभरातील तब्बल सहा हजार संघटना, स्वयंसेवी संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक |No permission to six thousand ngos for taking fund

    देशभरातील तब्बल सहा हजार संघटना, स्वयंसेवी संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – आयआयटी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक लागला आहे.No permission to six thousand ngos for taking fund

    यातील अनेक संस्थांच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नसल्याने तर काहींना केंद्राने सूचना दिल्यानंतर देखील त्यांनी परवान्याचे नूतनीकरण निर्धारित वेळेमध्ये न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.



    देशातील सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांनी त्यांच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज केला नव्हता. या परवाना नूतनीकरणाची डेडलाईन ही शुक्रवारी (ता.३१) संपत असल्याने या संस्थांना केंद्राकडून तशी आठवण देखील करून देण्यात आली होती

    पण त्यातील अनेकांनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केलेले नव्हते. अशा स्थितीमध्ये या संस्थांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.कोणतीही संघटना असो अथवा संस्थेला परकी निधी मिळविण्यासाठी ‘एफसीआरए’ कायद्याअंतर्गत नोंदणी करणे गरजेचे असते.

    देशातील ‘एफसीआरए’अंतर्गत नोंदणी असलेल्या स्वयंसेवी संस्थांची संख्या शुक्रवारपर्यंत २२ हजार ७६२ एवढी होत, शनिवारी ती १६ हजार ८२९ वर पोचली. देशातील जवळपास ५ हजार ९३३ संस्थांची नोंदणी ही रद्द झाल्याचे दिसून आले आहे.

    No permission to six thousand ngos for taking fund

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य