• Download App
    ‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’ No one died due to Cyclone Biparjoy Amit Shah praised the rescue teams

    ‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’

    ‘’…मग काम केल्याचे समाधान मिळते.’’ असंही अमित शाह यांनी सांगितलं आहे

    विशेष प्रतिनिधी

    कच्छ : बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी सरकार आणि सर्व सुरक्षा दलांचे कौतुक केले आहे. सुरक्षितपणे आणलेल्या लोकांना भेटण्यासाठी ते शनिवारी (17 जून) कच्छच्या जाखाऊ येथील शेल्टर होममध्ये पोहोचले होते. No one died due to Cyclone Biparjoy Amit Shah praised the rescue teams

    अमित शाह म्हणाले, “चक्रीवादळाची बातमी आल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे चक्रीवादळ ताशी १४० किमी वेगाने आले, तेव्हा त्यात कोणीही मरण पावले नाही. हे एक टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”

    अमित शाह पुढे म्हणाले, “बिपरजॉयचा धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये प्रशासनाला सतर्क करण्यासाठी स्वतंत्र बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि माहितीची देवाणघेवाण करण्यात आली होती. १४० किमी वेगाने चक्रीवादळ जेव्हा किनारपट्टीवर आदळते आणि तिसऱ्या दिवशी त्याचा आढावा घेतला जातो, त्यानंतर एकाही व्यक्तीला जीव गमवावा लागला नसल्याचे कळते, मग काम केल्याचे समाधान मिळते.”

    सुरक्षा दलांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, एनडीआरएफच्या 19 टीम, एसडीआरएफच्या 13 टीम आणि रिझर्व्ह 2 बटालियनने एकत्र काम केले. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, बीएसएफ, राज्य राखीव पोलीस, राज्य पोलीस यांनी एकत्रितपणे काम केले आहे. मोबाईल टॉवर, रुग्णालये जेथे वीज नाही तेथे डिजी संच बसविण्यात आले आहेत. वीज पूर्ववत करण्यासाठी 1 हजार 133 पथके कार्यरत आहेत. उद्यापासून त्यांच्यात आणखी 400 संघ जोडले जातील.”

    No one died due to Cyclone Biparjoy Amit Shah praised the rescue teams

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी