वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) परदेशात बसलेल्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने मोस्ट वाँटेड यादीत जवळपास 21 दहशतवाद्यांची नावे नोंदवली आहेत. या यादीत कॅनडा, अमेरिका आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नावे आहेत.No more pro-Khalistan terrorists abroad, 21 names on NIA’s most wanted list
एनआयएच्या वेबसाइटवर या खलिस्तानींच्या नावासह फोटो टाकण्यात आले आहेत. या यादीत लखबीर सिंग लांडा, मनदीप सिंग, सतनाम सिंग, अमरिक सिंग यांसारख्या खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची नावे आणि तपशील आहेत.
एनआयएची टीम अमेरिकेला जाणार
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेल्या खलिस्तानींवर कारवाई केली जाईल. 17 जुलैनंतर एनआयएचे 5 सदस्यीय पथक अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे जाईल, जिथे ते वाणिज्य दूतावासातील हल्ल्याची चौकशी करेल. खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला होता.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआय, इंटेलिजन्स ब्युरो आणि राज्य पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी एक डॉजियर तयार केला आहे. यामध्ये ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाच्या दूतावासावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यासंदर्भात एनआयएने खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांची संपूर्ण यादी तयार केली आहे.
No more pro-Khalistan terrorists abroad, 21 names on NIA’s most wanted list
महत्वाच्या बातम्या
- 72 हुरें चित्रपटाचे निर्माते अशोक पंडित यांना सुरक्षा; सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या
- बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयची 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक, सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याचे आरोप
- राष्ट्रवादीत संघटनात्मक निवडणुकांना कायमच वाटाण्याच्या अक्षता; पवारांनी “लोकशाही”ला दाखवला नेहमीच चव्हाटा!!
- Liquor policy scam : ‘ईडी’ने मनीष सिसोदियांच्या दोन मालमत्तांसह तब्बल ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!