विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: हिंदी ही सर्वच प्रादेशिक भाषांना जोडणारा दुआ आहे. मात्र, कोणतीही भाषा कमी दर्जाची नसल्यामुळे सर्वच भाषांना प्रोत्साहन मिळायला हवे. घरात मुलांशी मातृभाषतूनच बोला असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.No language is inferior, Amit Shah appeals to speak to children in mother tongue at home
हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, आपली मुले इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असली, तरी पालकांनी त्यांच्यासोबत घरात मातृभाषेतच संवाद साधावा, जेणेकरून मुलांना आपल्या मातृभाषेची ओळख होईल. आपण घरात मुलांशी मातृभाषेत बोललो नाही, तर मुलांचा आपल्या भाषेसोबतचा संबंधच संपुष्टात येईल. आपल्या भाषेचे महत्त्व त्यांना कधीच कळणार नाही.
देशातील अन्य प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषेत फार जास्त फरक नाही. हिंदी ही देशातील सर्वच प्रादेशिक भाषांची मित्र आहे. देशातील सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे सर्व भाषांना प्रोत्साहन देणे ही आजची मोठी गरज आहे.
2014 पासून बहुतांश खासदार संसदेत आपल्या मातृभाषेतच बोलत आहेत. ते जे काही बोलतात, त्याचा इंग्रजी आणि हिंदीत अनुवाद करण्यात येतो. यामुळे हे सर्व लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे मांडू शकतात, असे शहा यांनी सांगितले.
No language is inferior, Amit Shah appeals to speak to children in mother tongue at home
महत्त्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा
- भाजपने चार मुख्यमंत्री बदल्याच्या बदलण्यावरून गडकरींच्या टोलेबाजीची माध्यमांची मखलाशी, पण काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या अस्वस्थतेचे काय?
- Defamation case : कंगना रणावत न्यायालयात पोहोचलीच नाही, न्यायाधीश म्हणाले – जर ती पुढील सुनावणीला आली नाही तर तिच्या नावाचे अटक वॉरंट जारी केले जाईल
- आमचेही प्रश्न सोडवा; शिवसैनिकाचा टाहो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास